जालना : जन्मदात्या आईनेच पोटच्या ५ वर्षीच्या मुलाला झोपेत गळफास देऊन स्वत: घरातच गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जाफराबाद तालुक्यातील आदरखेडा येथे गुरुवारी सकाळी उघडकीस आली. गंगासागर महादू उगले (वय २८) व अंश महादू उगले (वय ५) अशी मृतांची नावे आहेत. आदरखेडा येथील दिलीप उगले यांचा मुलगा महादू उगले यांचा विवाह वर्ष २०१३ मध्ये भोकरदन तालुक्यातील सिपोरा बाजार येथील महादू कुदर यांची कन्या गंगासागर यांच्याशी झाला होता. महादु उगले छत्रपती संभाजीनगर येथे एका कंपनीमध्ये नोकरीला असल्याने दोघे पती-पत्नी संभाजीनगरला राहत होते. संसार सुरळीतपणे सुरू असतानाच गंगासागर उगले यांना मानसिक आजार जडल्याने तिच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु प्रकृतीमध्ये कुठलीच सुधारणा होत नसल्याने दोन महिन्यांपूर्वी पती महादू उगले यांनी मुलगा अंश व पत्नी गंगासागर यांना आदरखेडा येथे आईवडिलांकडे आणून सोडले होते.

हेही वाचा : छत्रपती संभाजीनगर: भाजपच्या व्यवस्थापन कौशल्याची भुमरे यांना साथ

Accident
Accident News : सुरक्षेसाठी बसवलेली एअरबॅग ठरली जिवघेणी! वाशी येथे अपघातात ६ वर्षीय मुलाचा मृत्यू
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
car hit student bus Motala , car hit person Death Motala ,
बुलढाणा : बसचे इंजिन तापल्याने पाणी घालायला उतरला आणि इतक्यात…
Image Of Supriya Sule.
Supriya Sule : “मी मुख्यमंत्र्यांची विरोधक आहेच पण…”, बीड आणि परभणी प्रकरणी सुप्रिया सुळेंचे फडणवीसांना आवाहन
Pune Accident
Pune Accident : “अचानक डंपरचा मोठा आवाज आला, आम्ही जागेवरुन उठून पुढे जाईपर्यंत…”, प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितलं?
Pune Wagholi Accident
Pune Dumper Accident : “…तर कदाचित ही दुर्घटना घडली नसती”; फुटपाथवर झोपलेल्या तिघांना डंपरने चिरडल्यानंतर रोहित पवारांची पोस्ट चर्चेत
Schoolboy commits suicide after not getting mobile phone sangli
सांगली: मोबाईल न मिळाल्याने शाळकरी मुलाची आत्महत्या
Leopard attacks in Sangamner, Leopard attacks Death youth, Leopard Sangamner,
अहमदनगर : संगमनेरमध्ये बिबट्याने युवकाच्या शरीराचे तोडले लचके, युवक ठार

गावाकडे असताना गंगासागर हिच्यावर खासगांव, विदर्भातील सैलानी येथे उपचार करण्यात आले. परंतु याचा कुठलाच उपयोग झाला नाही. दरम्यान गंगासागर उगले, मुलगा अंश तसेच सासू-सासरे घराबाहेर अंगणात झोपलेले होते. तेव्हा गंगासार हिने घरातील पत्राच्या लोखंडी अँगलला दोरीच्या सहाय्याने मुलगा अंशला गळफास दिला. त्यानंतर स्वत:ही गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली आहे. दरम्यान, सकाळी हा प्रकार लक्षात आला. जाफ्राबाद पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता जाफ्राबाद ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. या प्रकरणी गजानन उगले यांच्या फिर्यादीवरून जाफ्राबाद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला. पोलीस निरीक्षक प्रतापराव इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सखाहारी तायडे अधिक तपास करत आहेत.

Story img Loader