जालना : जन्मदात्या आईनेच पोटच्या ५ वर्षीच्या मुलाला झोपेत गळफास देऊन स्वत: घरातच गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जाफराबाद तालुक्यातील आदरखेडा येथे गुरुवारी सकाळी उघडकीस आली. गंगासागर महादू उगले (वय २८) व अंश महादू उगले (वय ५) अशी मृतांची नावे आहेत. आदरखेडा येथील दिलीप उगले यांचा मुलगा महादू उगले यांचा विवाह वर्ष २०१३ मध्ये भोकरदन तालुक्यातील सिपोरा बाजार येथील महादू कुदर यांची कन्या गंगासागर यांच्याशी झाला होता. महादु उगले छत्रपती संभाजीनगर येथे एका कंपनीमध्ये नोकरीला असल्याने दोघे पती-पत्नी संभाजीनगरला राहत होते. संसार सुरळीतपणे सुरू असतानाच गंगासागर उगले यांना मानसिक आजार जडल्याने तिच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु प्रकृतीमध्ये कुठलीच सुधारणा होत नसल्याने दोन महिन्यांपूर्वी पती महादू उगले यांनी मुलगा अंश व पत्नी गंगासागर यांना आदरखेडा येथे आईवडिलांकडे आणून सोडले होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा