छत्रपती संभाजीनगर : मुलींच्या आणि महिलांच्या प्रश्नासाठी शैक्षणिक संस्था संवेदनशील असल्याचा निकष म्हणून तसेच ‘नॅक’ मूल्यांकनात वरची श्रेणी गाठण्यासाठी राज्यभरात शाळा, महाविद्यालयांत बसविण्यात आलेली नऊ हजारांहून अधिक वेंडिंग यंत्रे आता धूळखात पडून आहेत. मासिक पाळीच्या काळातील हे चार दिवस आरोग्याचीही काळजी घेता यावी यासाठी शाळांमध्ये ही व्यवस्था करण्यात आली. त्याच्या वापराबाबत संकोच आणि अनास्थाच अधिक दिसते.

दिल्लीतील इन्स्टंट प्रो-क्यूरमेंट सर्व्हिस प्रा. लि. या कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी महाराष्ट्रातील जिल्हा परिषद शाळांसाठी ९ हजार ९४० ‘सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन’ दिले. त्यापैकी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शाळांमधील पाचवी ते सातवीचे वर्ग असलेल्या शाळांमध्ये सुमारे ३०० पेक्षा अधिक यंत्रे बसवण्यात आलेली आहेत. मात्र, या वेंडिंग यंत्रांची माध्यमिक शाळांमधील मुलींना आवश्यकता अधिक असताना तेथे ही यंत्रे अभावानेच आढळतात.

हेही वाचा : Sanjay Shirsat : छत्रपती संभाजीनगरचा पालकमंत्री कोण होईल? पालकमंत्र्यांची यादी कधी जाहीर होईल? संजय शिरसाटांनी सांगितली तारीख

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे उदाहरण घेतल्यास, तेथे जि. प. च्या पहिली ते सातवीपर्यंतच्या दोन हजार १०० शाळा आहेत. यातील दीड हजार शाळा या चौथीपर्यंतच्या आहेत. जिल्ह्यात आठवी व नववी, दहावीपर्यंतच्या ५२ शाळा आहेत. मात्र, वेंडिंग यंत्रे ही पाचवी ते सातवीपर्यंतच्या केंद्रनिहाय केवळ चार ते पाच शाळांमध्ये बसवण्यात आली आहेत. एका केंद्रात १५ शाळा असतात. या संदर्भाने मुंबईतून निघालेल्या निविदेनुसार जिल्ह्यातील सुमारे ३०० शाळांमध्ये वेंडिंग यंत्रे बसवण्यात आली. महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी अशीच कार्यपद्धती आहे. थोडक्यात जेथे अधिक गरज आहे तेथे ही यंत्रे कमी आहेत.

विल्हेवाटीचा प्रश्न गंभीर

●यंत्र वापरासाठी जबाबदारी देण्यात आलेल्या काही शिक्षिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार काही मुलींची त्या दिवसांमधील मानसिकता संकोचल्यासारखी असते.

हेही वाचा : ‘खंडणीच्या आड आल्याने देशमुख यांची हत्या’; युक्तिवादात विशेष तपास पथकाचा संशय

●मुख्य म्हणजे नॅपकिन विल्हेवाटीचा प्रश्न आहे. त्याची व्यवस्था विजेवरील असून, वीज नसेल तर नॅपकिन जाळता येत नाही.

●नॅपकिन जाळण्यातून निघणारा धूर मोठा असतो. त्यातूनही एक संकोच तयार होतो. काही शाळा मात्र, घरीच नॅपकिन देतात.

●या बंद पडलेल्या यंत्रांबाबत बोलण्यासही फारसे कोणी उत्सुक दिसत नाही.

Story img Loader