नांदेड : नांदेड दक्षिणचे आमदार मोहनराव हंबर्डे हे पिंपळगाव निमजी (ता. जि. नांदेड) कीर्तन कार्यक्रमासाठी आले असता, शुक्रवारी रोजी रात्री उशिरा सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी वाहनावर दगडफेक करून काचा फोडल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात आमदार मोहनराव हंबर्डे बचावले, मात्र त्यांच्या वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.

हेही वाचा : भाजपचा ‘माधव’ सूत्राबरोबर लिंगायत मतपेढीला आकार देण्यावर भर

Raju Patil Sandeep Mali
राजकिय वातावरण गढूळ करणाऱ्या शिंदे पिता-पुत्राचे राजकारण संपविण्याची वेळ आली आहे; मनसे आमदार राजू पाटील यांची संतप्त प्रतिक्रिया
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
maharashtra assembly election 2024 religious polarization experiment in solapur city central assembly elections
लक्षवेधी लढत : धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयोग यशस्वी होणार?
Heritage walk for voting awareness with the help of Municipal Corporation Mumbai print news
मतदानाच्या जनजागृतीसाठी ‘हेरिटेज वॉक’, महापालिकेचा संस्थेच्या मदतीने अनोखा उपक्रम
four pistols seized pune
पुणे: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सराइतांकडून चार पिस्तुले जप्त, पोलिसांकडून तिघे अटकेत
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
present of MP Shrikant Shinde to promote Sulabha Gaekwad print politics news
सुलभा गायकवाडांच्या प्रचारासाठी अखेर खासदार शिंदे मैदानात

सप्ताहाच्या कीर्तनासाठी आमदार हंबर्डे हे पिंपळगाव निमजी येथे आले होते. सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी गावात प्रवेश बंदी असल्याची सूचना देऊन आमदारांना गावात येण्यास मनाई केली होती. मात्र, आमदारांनी हट्ट धरल्यामुळे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी आमदार यांच्या वाहनावर दगडफेक केली, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. या हल्ल्यात आमदार हंबर्डे बचावले, मात्र त्यांच्या वाहनाचे नुकसान झाले.