नांदेड : मुदखेड तालुक्यातील रोही पिंपळगाव येथील ६ वर्षीय बालिका रविवारपासून बेपत्ता होती. सोमवारी १८ तासानंतर बालिकेचा मृतदेह मुदखेड-उमरी रस्त्यावरील नाल्यालगतच्या झुडुपात आढळून आला. घटनास्थळी श्वानपथकासह फॉरेन्सिक लॅबच्या तज्ज्ञांनी भेट दिली असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. मृत बालिकेचे काका प्रदीप शिंदे यांनी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांची भेट घेवून या प्रकरणातील आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : गोपीनाथ मुंडे यांचे विस्मरण भाजपला परवडेल का?

मृत बालिका हरवल्याबाबतची तक्रार पोलीस ठाण्यात दिल्यानंतर माहिती कळविण्याचे आवाहन समाज माध्यमातून करण्यात आले होते. घटनास्थळी भोकरचे अपर पोलीस अधीक्षक खंडेराय धरणे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक, पोलीस निरीक्षक वसंत सप्रे आदींनी भेट दिली. बालिकेचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नांदेड येथील शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालय येथे पाठविण्यात आला आहे. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी रविवारी बालिकेला पळवून नेले असल्याची चर्चा दिवसभर सुरू होती.