नांदेड : रविवारी सायंकाळी उमरी, अर्धापूर, भोकर, तामसा आणि हिमायतनगर या तालुक्यांत वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. सुमारे अर्धातास झालेल्या या गारपिटीने शेतपिकांचे प्रचंड नुकसान झाले. हवामान खात्याने ९, १० आणि ११ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा इशारा दिला होता.

हेही वाचा : ‘मुद्रा’ योजनेतील थकीत कर्जे चार हजार २३४ कोटींवर; परभणी जिल्ह्यात सर्वाधिक प्रमाण

उमरी तालुक्यातील बिनताळ, जिरोना, ईश्वरनगर, दुर्गानगर, गोरठा, तळेगाव तसेच अर्धापूर, भोकर, तामसा, आणि हिमायतनगर येथे रविवारी सायंकाळी ५.१५ च्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यास सुरुवात झाली. त्यानंतर अवकाळी पाऊस आणि मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. या गारपिटीमध्ये गहू, ज्वारी, हरभऱ्यासह फळबागांचे मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी आंब्याच्या झाडाला मोहर आला होता. मात्र या गारपिटीने तो गळून पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.

Story img Loader