छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर पाेलीस आयुक्तालयांतर्गत अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या (पाेक्साे) घटनांनी या वर्षाच्या अखेरपर्यंत शंभरीपार केली आहे. पाेक्साेची ही शंभरीपार संख्या २०२१ व २०२२ या मागील दाेन वर्षांच्या तुलनेत अधिक असून एकूणच महिला विषयक खून, हुंडाबळी, छळवणूक, अपहरणासह अल्पवयीन मुलींवर अत्याचारांच्या घटनांचा आलेख वाढताच असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पाेलीस आयुक्तालयाकडून बुधवारी आयाेजित पत्रकार बैठकीत वर्षभरातील विविध गुन्हे, त्यांचा तपास आदींच्या माहितीचे प्रगती पुस्तक मांडले. पाेलीस आयुक्त मनाेज लाेहिया यांच्यासह प्रमुख अधिकारी यावेळी उपस्थित हाेते.

महिला विषयक गुन्ह्यांमध्ये २०२१ मध्य दाेन खुनाच्या दाेन घटना असून दाेन्हींचा छडा लावण्यात यश आले. २०२२ व २०२३ मध्ये प्रत्येकी आठ खुनाचे गुन्हे नाेंद झाले असून सर्व उघड झाले आहेत. खुनाच्या प्रयत्नाचा २०२१ मध्ये सहा तर २०२२-२३ मध्ये सात गुन्हे नांद आहेत. हुंडाबळीच्या घटनांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत दुप्पट वाढ झाली आहे. २०२१ मध्ये पाच तर २०२२ मध्ये ४ हुंडाबळीच्या घटना नाेंद आहेत. २०२३ मध्ये आठ हुंडाबळी नाेंद झाले आहेत. महिलांच्या आत्महत्यांच्या घटनेतही साल २०२१ च्या तुलनेत जवळपास दुप्पट वाढ झाली आहे. २०२१ मध्ये ११ आत्महत्या, २०२२ मध्ये ८ तर २०२३ मध्ये २१ आत्महत्यांची नाेंद झाली आहे.

हेही वाचा… उद्घाटनाचे कार्यक्रम आखा, भूमीपूजन उरका! आचारसंहितेपूर्वी डॉ. भागवत कराड यांची कसरत

अल्पवयीन मुलींवर अत्याचाराचे पाेक्साे कायद्यांतर्गत २०२१ मध्ये १०० गुन्हे दाखल हाेते. ९९ प्रकरणांचा उलगडा झाला. २०२२ मध्ये ९९ तर २०२३ मध्ये १०२ गुन्ह्यांमधील १०१ प्रकरणे उघडकीस आले आहेत. मंगळसूत्र चाेरीच्या घटना २०२१ मध्ये ३८, २०२२ मध्ये ४४ व २०२३ सालात ५७ गुन्हे गुन्हे नाेंद असून तीन वर्षातील मिळून ४६ प्रकरणांचा तपास बाकी आहे. महिलांच्या छळवणुकीच्या (४९८ अ) घटनामध्ये २०२१ मध्ये मात्र, घट झाली असून २०२१ मध्ये २८८, २०२२ मध्ये २५३ तर २०२३ अखेरपर्यंत २३९ गुन्हे नाेंद आहेत. २०२१ मध्ये . महिला विषयक एकूण ७४५, २०२२ मध्य ८२९ तर २०२३ मध्ये ९४२ गुन्हे नाेंद झाले असून, दामिनी पथकाकडून करण्यात आलेल्या कारवाईची, जनजागृतीच्या संदर्भाने राबवलेल्या उपक्रमांची माहिती देण्यात आली. सात बालविवाह थांबवण्यात आले. ३६४ कार्यशाळा घेतल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

आर्थिक गुन्हे शाखेकडे दाखल दहा प्रकरणांमध्ये ३७६ काेटी ८१ लाख ६ हजार ६७७ रुपयांची फसवणूक झाल्याचे गुन्हे नाेंद आहेत. सायबर पाेलीस ठाण्याकडे ३ हजार ८६८ तक्रारींचे अर्ज प्राप्त झाले असून एक हजार ९३६ प्रकरणांचा तपास प्रलंबित आहे. अनेक क्लिष्ट गुन्हे उघडकीस आणल्याचा दावाही पाेलिसांकडून करण्यात आला. तपासातून सापडलेला मुद्देमालही परत करण्यात आल्याचे व ६० तरुणांना व्यसनापासून दूर केल्याचा दावाही करण्यात आला.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Incidents of rape against minor girls pocso under the chhatrapati sambhajinagar police commissionerate have crossed 100 till the end of this year dvr