मंत्रिमंडळाच्या बैठकीची लगबग सुरू झाली असून भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत सोमवारी कोअर कमिटीची बैठक होणार आहे. त्या बैठकीत घटक पक्षांच्या नेत्यांनाही आमंत्रित करण्यात आले आहेत. या बैठकीनंतर बुधवारी मुख्यमंत्री मंत्रिमंडळाच्या सदस्यांसमवेत मुंबईत बैठक घेणार आहेत. मंत्रिपदाचे सूत्र पूर्वीच ठरलेले असल्याचे सांगत अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशी माहिती रावसाहेब दानवे पत्रकार बैठकीत दिली.
दीपावली स्नेहमिलन कार्यक्रमानिमित्ताने जालना येथे अनेकांच्या गाठीभेटी प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी घेतल्या. या वेळी मंत्रिमंडळ विस्ताराच्या अनुषंगाने कशा पद्धतीने घडामोडी होतील, याची माहिती त्यांनी दिली. अस्तित्वात असलेल्या मंत्र्यांपैकी कोणाला वगळले जाईल का, या प्रश्नाच्या उत्तरात आमच्या पक्षात अशी कोणतीही चर्चा झाली नाही, असे ते म्हणाले. घटक पक्षांबरोबरची बैठक उद्या होणार असल्याने मंत्रिमंडळात कोणाला किती स्थान मिळेल, या विषयीची रणनीती उद्या ठरण्याची शक्यता आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा