हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. मात्र, त्यात कोणाचा सहभाग असेल व कोणत्या विभागातून कोण व्यक्ती अशी चर्चा अजून झाली नसल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिली. मराठवाडय़ातील कितीजणांचा सहभाग असू शकेल, हे सांगण्यास त्यांनी नकार दिला. मात्र, महायुतीमधील सर्व घटकपक्षांना या विस्तारात स्थान असेल, असेही ते म्हणाले.
मंत्रिमंडळात शिवसेनेकडून मराठवाडय़ातील व्यक्तीचे नाव दिले जाईल, असे सांगितले जात आहे. प्रदेशाध्यक्ष दानवे, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर व ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे ही मंडळी पक्ष वाढविण्यासाठी पुढाकार घेत आहेत. शिवसेनेकडून मात्र मराठवाडय़ातील एकही नाव सध्या नसल्याने अडचण निर्माण होत असल्याचे सांगितले जात होते. या पाश्र्वभूमीवर शिवसेनेकडून अर्जुन खोतकर यांचे नाव नक्की असल्याचे सांगितले जाते. प्रताप पाटील चिखलीकर, संजय शिरसाट यांची नावेही चच्रेत आहेत. मराठवाडय़ातील भाजपच्या कोणत्या आमदारांचा क्रमांक लागू शकतो, याच्या चर्चा सुरू आहेत. लातूर जिल्ह्यातील आमदार या चच्रेत आघाडीवर आहेत. प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी मात्र गुरुवारी कोणाचेही नाव घेण्याचे टाळले.
‘अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार; विभागवार नावे अजून अनिश्चितच’!
हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. मात्र, त्यात कोणाचा सहभाग असेल व कोणत्या विभागातून कोण व्यक्ती अशी चर्चा अजून झाली नसल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिली.
Written by बबन मिंडे
First published on: 04-12-2015 at 01:30 IST
Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Increase cabinets before winter session