महाराष्ट्र लोकसेवा आयोग वगळता अन्य सर्व सरळ सेवा भरतीच्या परीक्षांचे शुल्क आता सरसकटपणे एक हजार रुपये करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. सर्वसाधारणपणे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा वगळून अन्य परीक्षांचे सरासरी शुल्क ६०० ते ६५० रुपये असे.
पूर्वीच्या दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील सरळ सेवेची पदे भरताना होणाऱ्या ऑनलाइन परीक्षेसाठी टीसीएस-आयओएन (टाटा कन्सल्टन्सी सव्र्हिसेस लिमिटेड) व इन्स्टिटय़ूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या प्रत्येक परीक्षेचे दर वेगळे होते. त्यावर वस्तू व सेवा कराची भर असे. त्यामुळे आता वस्तू व सेवा कर आणि प्रशासकीय खर्चापोटी एक हजार प्रत्येक उमेदवाराकडून आकारण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

हिंगोली जिल्ह्यातून आलेल्या व औरंगाबाद येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा गणेश टाले म्हणाला, एखाद्या उमेदवारास सलग चार अर्ज भरावे लागले तर त्याचे सर्व आर्थिक गणितच कोलमडून जाईल.केंद्रातील विविध पदांच्या भरतीमध्ये अनुसूचित जाती व जमाती तसेच महिलांसाठी शुल्कही आकारले जात नाही. राज्यात अनुसूचित जाती व जमातीसाठीही शुल्कात केवळ १० टक्के रक्कम कमी करण्यात आली आहे. हे शुल्क एवढे अधिक आहे की अनेक विद्यार्थी अर्ज करताना विचार करतील, असे ऑनलाइन परीक्षा फॉर्म भरून देणाऱ्या व्यावसायिकासही वाटते. अलीकडेच शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीसाठी ९५० रुपयांचे शुल्क आकारण्यात आले होते. बँकिंग सेवेसाठी सरासरी परीक्षा शुल्क ६०० ते ७५० रुपयांपर्यंत असे.

Deputation in MPSC by circumventing the rules
नियम डावलून ‘एमपीएससी’मध्ये प्रतिनियुक्ती? माहिती अधिकार अर्जाला काय दिले उत्तर?
27th Rashibhavishya In Marathi Horoscope Today
27 October Horoscope : अचानक धनलाभ ते‌ वैवाहिक…
upsc exam preparation tips
UPSC ची तयारी : UPSC मुख्य परीक्षा २०२४ – प्रश्नांचे अवलोकन (भाग ३)
Important Clarification of State Board regarding 10th and 12th Exam Time Table
दहावी, बारावी परीक्षा वेळापत्रकाबाबत राज्य मंडळाचे महत्त्वाचे स्पष्टीकरण… नेमके झाले काय?
Recruitment of Engineers , Mumbai Municipal Corporation, Engineers in Mumbai Municipal Corporation,
मुंबई महापालिकेत अभियंत्यांची भरती, चार – पाच वर्ष रखडलेल्या भरतीला अखेर मुहूर्त सापडला
preliminary exam for group b group c service recruitment by mpsc
एमपीएससीतर्फे गट ब, गट क सेवेतील पदभरतीसाठी आता स्वतंत्र पूर्व परीक्षा; दोन्ही सेवांच्या स्वतंत्र जाहिराती प्रसिद्ध
Maharashtra Public Service Commission Recruitment for 1813 Posts Nagpur
मोठी बातमी: ‘एमपीएससी’कडून मेगा भरती! तब्बल १८१३ पदांसाठी संयुक्त परीक्षेची घोषणा
Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University Winter 2024 exam dates announced Nagpur news
नागपूर: विद्यार्थ्यांनो; विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांच्या तारखा जाहीर; जाणून घ्या सविस्तर…