छत्रपती संभाजीनगर: भारतीय जनता पक्षाला हरविण्यासाठी जे कोणी इंडिया आघाडीत यायला तयार आहेत त्यांना सामावून घेऊ. प्रकाश आंबेडकर यांनाही येता येईल; पण ते तयार आहेत का, असा प्रश्न सीताराम येचुरी यांनी शनिवारी विचारला. मायावती असो किंवा प्रकाश आंबेडकर त्यांनी यावे. पण प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांना पत्र दिले असते तर त्यांनी तसे सांगितले असते. पण आघाडीत सहभागी होण्याबाबत त्यांनी खरेच पत्र दिले आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. इंडिया आघाडीत आता ५५ पक्ष आहेत. धर्मनिरपेक्ष व देशाचे संविधानिक अधिकार राखण्यासाठी या आघाडीला मजबूत करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन येचुरी यांनी  केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा