छत्रपती संभाजीनगर/जळगाव : सोयगाव तालुक्यातील धारेश्वरच्या पर्यटन स्थळावरील धबधब्याच्या ठिकाणच्या कुंडात तोल जाऊन पडलेल्या एका तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी सायंकाळी घडली असून मृत गौरव किसन नेरकर (वय २०) याचा मृतदेह सोमवारी सकाळी कुंडाच्या कपारीत आढळून आला. मृत गौरव हा जळगाव शहरातील खंडेराव नगरातील रहिवासी असल्याची माहिती पुढे आली आहे. दरम्यान, मृत गौरव याच्या पार्थिवावर जळगाव येथील स्मशानभूमीत रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले.

हेही वाचा >>> छत्रपती संभाजीनगर: गोळी झाडून हाॅटेलचालकाचा खून

Youth murder Amravati, Amravati Crime news,
अमरावती : युवकाची हत्‍या अन् संतप्‍त नागरिकांचा पोलीस ठाण्‍यासमोर ठिय्या
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
Funeral in light of mobile, Funeral Naigaon Koliwada,
वसई : मोबाइलच्या प्रकाशात अंत्यसंस्कार, नायगाव कोळीवाड्यातील स्मशानभूमीची दुरवस्था
pune husband kills wife
चारित्र्याच्या संशयातून महिलेच्या डोक्यात सिलिंडर घालून खून, विश्रांतवाडी भागातील घटना; पती गजाआड
dead man cremated in front of golegaon gram panchayat in sillod
सिल्लोडमधील गोळेगाव ग्रामपंचायत समोरच मृत व्यक्तीचा अंत्यविधी
murder in nagpur, crime news
नागपूर : धक्कादायक! प्रेयसीच्या चारित्र्यावर संशय; मित्राला घराच्या छतावरून फेकले…
caste panchayat investigates woman for love marriage with father in law in chhatrapati sambhajinagar
सासऱ्याच्या प्रेमविवाहाबद्दल महिलेला जातपंचायतीचा जाच
Akshays parents went to Ambernath Municipality for burial permission their application was not accepted
अंबरनाथमध्येही अक्षय शिंदेच्या दफनविधीला विरोध पालकांची पालिका, स्मशानभूमी आणि पोलिसात धाव

जळगाव येथील १६ जणांच्या समूहासोबतच गौरव धारेश्वरच्या पर्यटन स्थळी आला होता. रविवारी सायंकाळी सहा वाजता धबधब्याजवळ भ्रमंती करत असताना गौरवचा अचानक तोल जाऊन पाय घसरला व तो धबधब्यात जाऊन पडला होता. एक तास होऊनही तो परतला नसल्याने त्याचे मित्रांनी त्याचा शोध घेतला. परंतु तो आढळला नाही. त्यामुळे त्यांनी रात्री आठ वाजता बनोटी पोलीस दुरक्षेत्र गाठून गौरव हरविल्याची तक्रार दिली होती. त्यावरून सोयगाव पोलिसांनी संशयावरून गौरवचा धबधब्यात शोध सुरू केला होता. रात्री एक वाजेपर्यंत पोलिसांनी ग्रामस्थ व पोलीस पाटील सुनील जाधव यांच्या मदतीने शोध मोहीम राबविली होती. पुन्हा सोमवारी सकाळी सात वाजता सोयगावचे उपनिरीक्षक रजाक शेख, विकास दुबिले, संदीप सुसर, सतीश बर्डे, राजू बर्डे,यांनी पट्टीचे पोहणारे रामदास जाधव यांच्या मदतीने, पोलीस पाटील सुनील जाधव, श्रीरंग जंजाळ, बंडू पाटील, सोन्या गवळी आदींनी शोध मोहीम हाती घेतली. अखेर अकरा वाजता रामदास जाधव यांना धबधब्याच्या खोल कपारीत मृत गौरव नेरकरचा मृतदेह आढळून आला. बनोटी प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. कादरी सपुरा यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकच्या ताब्यात देण्यात आला आहे.