परभणीत एटीएमचा पासवर्ड न दिल्याच्या कारणावरुन एका तरुणाची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. संतोष सांगळे असे या मृत तरुणाचे नाव असून या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. तर त्यांच्या तिसऱ्या साथीदाराचा शोध सुरू आहे.

ताडकळसमधील पिप्री येथे जेसीबी चालकाची हत्या केल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणी पोलिसांनी तपास करत दोन जणांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय उर्फ अजिंक्य जगताप, रामेश्वर सुभाष देवनाळे आणि वैभव नंदू मानवतकर हे तिघे आरोपी चितेगाव येथील कंपनीत काम करतात. औरंगाबादवरुन निघाल्यानंतर आधी त्यांनी बजाज चौकात एका व्यक्तीला चाकूचा धाक दाखवून लुबाडले. तिथून जालना औद्योगिक वसाहतीजवळही एका दुचाकीस्वाराला लुबाडले. यानंतर ते परभणीतील पिप्री येथे पोहोचले. २० नोव्हेंबर रोजी त्यांनी जेसीबी चालक संतोष सांगळे व त्याचा सहकारी उमेश रावत यांना गाठले. त्यांनी संतोषकडे एटीएमचा पासवर्ड मागितला. मात्र, त्याने नकार दिल्याने संतोषची हत्या केल्याची कबुली चोरट्यांनी दिली आहे.यातील अजिंक्य जगताप हा तरुण अद्याप फरार असून उर्वरित दोघांना अटक करण्यात आली आहे.

Story img Loader