छत्रपती संभाजीनगर – धाराशिव जिल्ह्यातील कळंब तहसीलदारांच्या शासकीय वाहनावरील चालकास मागितलेल्या १५ हजारांपैकी आठ हजार रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केल्याची माहिती बुधवारी सकाळी दिली. वाळूची वाहतूक करू देणे व ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी म्हणून अनिल शिवराम सुरवसे (वय ५४, रा. लोहारा) याने १५ हजारांच्या लाचेची मागणी केली होती. त्याची तक्रार १९ डिसेंबर रोजी केल्यानंतर पडताळणी करण्यात आली. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> राज्यातील बीच शॅक्स पॉलिसी कागदावरच… आनंद कुट्यांचे प्रकल्प रखडले

तडजोडीअंती अनिल सुरवसे याने आठ हजार रुपये देण्याचे तक्रारदारास सांगितले. त्यानुसार तक्रारदार बुधवारी सकाळी रक्कम घेऊन गेल्यानंतर आठ हजार रुपये घेताना सुरवसे यास रंगेहाथ पकडले. अनिल सुरवसे हा कळंब तहसील कार्यालयात वर्ग – ३ पदावरील कर्मचारी म्हणून काम करत आहे. सध्या तो तहसीलदारांच्या वाहनावर चालक म्हणून काम करत आहे. तो तक्रारदाराकडून महिन्याला १५ हजारांचा हप्ता घेत असल्याची माहिती पुढे आली असून, यातल्याच रकमेतील आठ हजार घेताना अनिल सुरवसे याला बुधवारी सकाळी पंचांसमक्ष पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सिद्धराम म्हेत्रे यांच्या पथकाने ही कारवाई करून अनिल सुरवसे याला ताब्यात घेऊन कळंब पोलिसांच्या ताब्यात दिले. गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे.  असुन पोलीस स्टेशन कळंब , ज़िल्हा धाराशिव येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे.