लोकसत्ता प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर : कन्नड तालुक्यातील करंजखेडा येथील महादेव खोरा शिवारातील शेतात महिला सरपंचाच्या पुत्राची धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. नीलेश कैलास सोनवणे (वय ३०), असे मृत तरुणाचे नाव आहे. खुनाच्या घटनेमागे राजकीय वादाची पार्श्वभूमी असल्याची प्राथमिक माहिती आहे. याप्रकरणी सरपंच संगीताबाई कैलास सोनवणे यांच्या फिर्यादीवरून सहा जणांविरुद्ध पिशोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी वाचा-देवस्थान जमिनीचा निर्णय मठ मंदिरांसाठी घातक; विश्व हिंदू परिषदेची भूमिका

भगवान काशिराम कोल्हे, मयूर सुभाष साळुंके, विजय बापू वाघ, धनराज भगवान कोल्हे, भूषण शंकर कारले, रुपेश मोकासे (सर्व रा. करंजखेडा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. फिर्यादीनुसार मृत नीलेश सोनवणे गुरुवारी सकाळीच शेतात गेला होता. शेतात जाताना आरोपींशी वाद झाला. करंजखेडा येथील सरपंचपद राखीव असून गावातील भगवान कोल्हे यांच्या उमेदवाराला पराभूत करून निवडून आल्याने त्यांचा राग होता आणि त्यातूनच सोनवणे परिवाराला जातीवाचक शिवीगाळ करणे, त्रास देणे, असे प्रकार घडले आहेत. त्यानुसार गुन्हाही यापूर्वी दाखल आहे, असे तक्रारीत म्हटले आहे.

Story img Loader