भारतीय जनता पक्षाच्या शहराध्यक्षपदी माजी आमदार किशनचंद तनवाणी यांची रविवारी सर्वानुमते निवड करण्यात आली. शहरात शिवसेनेचे वाढते वर्चस्व कमी करण्याच्या उद्देशाने ही निवड केली असल्याचे मानले जाते.
गेल्या काही दिवसांपासून शहरात भाजपअंतर्गत संघटनात्मक निवडणुकांचे वारे वाहत होते. प्रभाग व मंडळ अध्यक्षांची निवड प्रक्रिया नुकतीच पार पडली. शहरातील सर्व मंडळ प्रमुखांची निवड पार पडल्यानंतर सर्वानुमते तनवाणी यांची निवड करण्यात आली. प्रदेश निरीक्षक माजी आमदार सुभाष देशमुख यांच्या निरीक्षणाखाली ही निवड झाली. माजी शहर जिल्हाध्यक्ष बापू घडामोडे यांनी सर्व कार्यकर्त्यांनी निवडणुकांमध्ये केलेल्या सहकार्याबद्दल या वेळी आभार मानले. यानंतर घडामोडे यांनी नवे शहराध्यक्ष तनवाणी यांच्याकडे पदाची सूत्रे सुपूर्द केली. वॉर्ड व बूथ तेथे कार्यकर्ता तयार करून सर्व शहर भाजपमय करण्याचे आपले उद्दिष्ट राहील, असे तनवाणी यांनी सांगितले. प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड, चिटणीस मनोज पांगरकर, प्रवीण घुगे, संजय केणेकर, उपमहापौर प्रमोद राठोड, स्थायी समिती सभापती दिलीप थोरात, हेमंत खेडकर आदी उपस्थित होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा