लोकसत्ता प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर : धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालूक्यात धुमाकूळ घालणारा बिबटया अखेर गुरुवारी कपिलापुरी येथे जेरबंद करण्यात आला. अनेक महिन्यांपासून या बिबट्याची शेतकरी, ग्रामस्थांमध्ये भीती निर्माण झाली होती. त्याला पिंजऱ्यात अडकण्याचे प्रयत्न सुरू होते. अखेर शिकारीसाठी आलेला तो बिबट्या पिंजऱ्यात अडकला. बिबटयाला पाहण्यासाठी संपूर्ण गाव जमा झाले होते.

परंडा तालूक्यातील अनेक जनावरांवर हल्ला करून फडशा पाडला होता. १९ मार्च रोजीच कपिलापुरी येथे भरदिवसा मसगुडे यांच्या शेळीवर हल्ला केला होता. तर रात्री वर्धमान जैन यांच्या रेडीवर हल्ला करून ठार केले होते. बिबट्या दोन दिवसांपासून कपिलापुरी शिवारात हल्ले करीत असल्याने वन विभागाकडून पिंजरा लावण्यात आला होता. मात्र १९ रोजी गज तुटल्याने पिंजऱ्यातील बोकड घेऊन बिबटया पळाला होता.

ग्रामस्थांनी पिंजऱ्याला वेल्डिंगग करून दुरुस्ती केल्यानंतर वन विभागाच्या वतीने दुसऱ्या दिवशी २० मार्च रोजी पुन्हा पिंजरा लावण्यात आला होता. याच दरम्यान पुन्हा शिकारीसाठी आलेला बिबटया अखेर पिंजऱ्यात अडकला.

Story img Loader