छत्रपती संभाजीनगर – शहरात प्रमुख व गजबजलेल्या वसाहतीत सोमवारी पहाटे ३.३० च्या सुमारास बिबट्या सदृश प्राण्याचे दर्शन सीसीटिव्ही मध्ये कैद झाले. याला वनविभागाकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नसला तरी स्थानिक रहिवाशांनी सीसीटिव्हीचे फुटेजचा आधार घेत तो बिबट्याच असल्याचा दावा केला आहे. उल्का नगरी या अत्यंत उच्चभ्रू वसाहतीतील साईशरण पेट्रोलपंप नजीकच्या खिंवसरा पार्कजवळच्या प्लॉट नं. ६४ च्या आसपास मोकळी जागा असून त्या भागात सुमारे ३०० झाडे आहेत. याच ठिकाणी झाडांआडून पळताना बिबट्या पळत आहे. या संदर्भात नगरसेवक दिलीप थोरात यांनी तो प्राणी बिबट्याच असून सुरुवातीला आम्हाला अफवा वाटली, पण सीसीटिव्ही फुटेज पाहता तो बिबट्याच असल्याचे दिसते, असे सांगितले. दरम्यान, या फुटेज समाज माध्यमांवर प्रसारित झाल्याने परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
छत्रपती संभाजीनगरच्या भरवस्तीत बिबट्याचे दर्शन; रहिवाशांमध्ये भीती
वनविभागाकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नसला तरी स्थानिक रहिवाशांनी सीसीटिव्हीचे फुटेजचा आधार घेत तो बिबट्याच असल्याचा दावा केला आहे.
Written by लोकसत्ता टीम
![leopard spotted early morning in chhatrapati sambhajinagar](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2024/07/leapred.jpg?w=1024)
First published on: 16-07-2024 at 01:00 IST | © The Indian Express (P) Ltd
Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Leopard spotted early morning in public place of chhatrapati sambhajinagar zws