येथील जि. प.च्या प्रशासकीय इमारतीतील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कक्षातील पीओपीचे छत पडल्याने चांगलाच गोंधळ उडाला. उद्घाटनापासूनच इमारत बांधकाम वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. वारंवार दुरुस्तीवर केलेला लाखो रुपयांचा खर्च पाण्यात गेला. मात्र, आता ८ वष्रे उलटल्यानंतर प्रशासन जागे झाले असून नांदेडच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाला इमारतीच्या बांधकामाचे परीक्षण करण्याचे पत्र देण्यात आले. त्यामुळे खळबळ उडाली.
जि. प. इमारत बांधकाम पूर्ण होऊन आठ वषेर्ं लोटली. इमारतीचे थाटात उद्घाटन झाले. मात्र, सुरुवातीपासूनच इमारतीचे निकृष्ट बांधकाम चच्रेचा विषय बनले. इमारत पावसाळ्यात गळत असल्याने अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दालनात बदल करावे लागले. पाणीपुरवठा विभागातील महत्त्वाची कागदपत्रे पावसाच्या पाण्याने चिंब होऊन खराब झाली. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या स्वीय सहायक कक्षातील पीओपीचे छत पडल्याने गेल्या दोन वर्षांपासून त्यांनी इतर जागेवर ठाण मांडले. अध्यक्ष, उपाध्यक्ष, शिक्षण सभापती, समाजकल्याण अधिकारी यांच्या दालनाच्या दुरुस्तीवर कोटय़वधी रुपये खर्च झाले.
तत्कालीन सीईओ राहुल रेखावार यांनी इमारत गळत असल्याने छतावर लागणाऱ्या २२ लाखांच्या दुरुस्ती खर्चास मंजुरी दिली. दुरुस्तीचे काम पूर्ण झाले न झाले, तोच गेल्या महिन्यात सीईओंच्या दालनातील पीओपीचे छत कोसळले. सुदैवाने सीईओ दालनात नसल्याने दुर्घटना टळली. परंतु इमारत बांधकाम पुन्हा चच्रेचा विषय बनले. आजही जि. प.च्या उपाहारगृहातील प्रवेशद्वारापासून आतील भागात असलेली संपूर्ण फरशी उखडली आहे.
जि. प.चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी देशमुख यांच्याशी या बाबत संपर्क साधला असता, जि. प.च्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण करून त्यावर मिळालेल्या अहवालावरून जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. तसेच १५ दिवसांपूर्वी तिसऱ्या माळ्याच्या जिन्यावर लागलेल्या किरकोळ आगीची घटना घडली. त्यानंतर आता इमारतीचे फायर ऑडिटही करून घेतले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा