नाशिक आणि औरंगाबादमध्ये स्पर्धेची चुरस
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व शैलीचा कस पाहणाऱ्या लोकसत्ताच्या ‘वक्ता दशसहस्र्ोषु’ स्पर्धेत नाशिक विभागीय प्राथमिक फेरीतून विभागीय अंतिम फेरीसाठी एकूण ११ जण पात्र ठरले, तर स्पर्धेच्या औरंगाबाद विभागीय अंतिम फेरीसाठी मंगळवारी १० स्पर्धकांची निवड करण्यात आली. शहरी आणि ग्रामीण भागांतील विद्यार्थ्यांच्या अभ्यासू वृत्तीचा सुरेख संगम झाल्याचे या स्पर्धेतून आढळून आले. विविध फेऱ्यांमधून आपणास विजेतेपदाच्या भोज्याला शिवायचे आहे ही ईर्षांच उत्साह वाढविण्यास कारणीभूत ठरत असल्याचे मत स्पर्धकांनी व्यक्त केले. नाशिकची विभागीय अंतिम फेरी दोन फेब्रुवारी रोजी कुसुमाग्रज स्मारकात होणार आहे. ८ फेब्रुवारी रोजी औरंगाबादची विभागीय अंतिम फेरी देवगिरी महाविद्यालयात होईल.
राज्यभरातील आठही विभागांतून निवडण्यात आलेल्या वक्त्यांची १४ फेब्रुवारी रोजी मुंबईत महाअंतिम फेरी रंगणार आहे. ‘जनता सहकारी बँक पुणे’ व ‘तन्वी हर्बल प्रॉडक्ट्स’ या स्पर्धेचे प्रायोजक आहेत. सिंहगड इन्स्टिटय़ूट, मांडके हिअरिंग सव्र्हिसेस, इंडियन ऑइल, इन्स्टिटय़ूट ऑफ करिअर डेव्हलपमेंट अर्थात आयसीडी यांचे सहकार्य स्पर्धेला लाभले. तसेच युनिक अॅकॅडमी आणि स्टडी सर्कल स्पध्रेचे नॉलेज पार्टनर आहेत.
मंगळवारी रंगलेल्या नाशिक विभागीय प्राथमिक फेरीत ६२ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. प्राथमिक फेरीतून के.टी.एच.एम. महाविद्यालयाची हर्षांली घुले, लासलगाव महाविद्यालयाची आदिती भारती, आयुर्वेद महाविद्यालयाची अश्विनी एकतपुरे, कळवण महाविद्यालयाची गायत्री सोनवणे, शासकीय तंत्रनिकेतनचा प्रवीण खरे, भोसला महाविद्यालयाची मुग्धा जोशी, बी.वाय.के. महाविद्यालयाची मधुरा घोलप, नाशिकरोड बिटको महाविद्यालयाचा सुमित विसपुते, मविप्र औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचा विशाल मर्ढेकर, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा विवेक चित्ते, के.टी.एच.एम. महाविद्यालयाची श्वेता भामरे हे ११ जण विभागीय अंतिम फेरीसाठी निवडले गेले. परीक्षक म्हणून प्रा. गिरीश पिंपळे, सौ. नेहा सोमठाणकर, अपर्णा क्षेमकल्याणी, वैशाली शेंडे यांनी काम पाहिले.
औरंगाबादमधील विभागीय अंतिम फेरीसाठी निवड जाहीर झालेल्यांची नावे याप्रमाणे : अर्चना िनबा राजपूत (प्रताप महाविद्यालय, अंमळनेर), श्यामराव जगन्नाथ पाटील (दयानंद विधि महाविद्यालय, लातूर), रवींद्र ज्ञानेश्वर निकम (शिवाजी महाविद्यालय, कन्नड), आकांक्षा शरद चिंचोलकर (देवगिरी महाविद्यालय, औरंगाबाद), अंजना नाईक (ज्ञानोपासक महाविद्यालय, परभणी), प्रणव सुभाष खाडे (आदर्श महाविद्यालय, हिंगोली), भरत अर्जुनसिंग रिडलॉन (देवगिरी महाविद्यालय, औरंगाबाद), वैष्णवी अशोक मुळे, शुभम टाके (सरस्वती भुवन महाविद्यालय, औरंगाबाद), रोहित राजेंद्र वेताळ (अंबादास वरपूडकर कृषी महाविद्यालय, परभणी). परीक्षक डॉ. हृषिकेश कांबळे आणि दीपक पवार यांनी वक्त्यांना मार्गदर्शन केले.