‘लोकसत्ता’च्या वतीने आयोजित ‘वक्ता दशसहस्र्ोषु’ स्पर्धेच्या विभागीय अंतिम फेरीसाठी मंगळवारी १० स्पर्धकांची निवड करण्यात आली. वेगवेगळय़ा विषयांवर ठोस मत मांडणाऱ्या या वक्त्यांचा ८ फेब्रुवारीला कस लागणार आहे. या दिवशी विभागीय अंतिम फेरी देवगिरी महाविद्यालयात होईल.
जनता सहकारी बँक (पुणे), तसेच तन्वी हर्बल प्रायोजक असणाऱ्या या स्पर्धेत मराठवाडा व खान्देशातील ७६ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. दुसऱ्या दिवशीही स्पर्धक उत्साहाने सहभागी झाले. स्पर्धेसाठी सिंहगड इन्स्टिटय़ूट, मांडके हिअरिंग सव्र्हिसेस, इंडियन ऑइल, इन्स्टिटय़ूट ऑफ करीअर डेव्हलपमेंट (आयसीडी) यांचे सहकार्य लाभले, तर युनिक अॅकॅडमी आणि स्टडी सर्कल हे या स्पर्धेसाठी नॉलेज पार्टनर आहेत.
स्पर्धेत सहभाग घेता यावा म्हणून मराठवाडा आणि खान्देशातील खेडय़ातून औरंगाबादपर्यंत पोहोचण्यासाठी काही स्पर्धकांनी सोमवारीच घर सोडले होते. स्पर्धेत सुरुवातीलाच ‘लोकसत्ता’चे माजी संपादक डॉ. अरुण टिकेकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. विभागीय अंतिम फेरीसाठी निवड जाहीर झालेल्यांची नावे या प्रमाणे : अर्चना िनबा राजपूत (प्रताप महाविद्यालय, अंमळनेर), श्यामराव जगन्नाथ पाटील (दयानंद विधी महाविद्यालय, लातूर), रवींद्र ज्ञानेश्वर निकम (शिवाजी महाविद्यालय, कन्नड), आकांक्षा शरद चिंचोलकर (देवगिरी महाविद्यालय, औरंगाबाद), अंजना नाईक (ज्ञानोपासक महाविद्यालय, परभणी), प्रणव सुभाष खाडे (आदर्श महाविद्यालय, हिंगोली), भरत अर्जुनसिंग रिडलॉन (देवगिरी महाविद्यालय, औरंगाबाद), वैष्णवी अशोक मुळे, शुभम टाके (सरस्वती भुवन महाविद्यालय, औरंगाबाद), रोहित राजेंद्र वेताळ (अंबादास वरपूडकर कृषी महाविद्यालय, परभणी). स्पर्धेला कशा पद्धतीने सामोरे जावे याविषयी परीक्षक डॉ. हृषीकेश कांबळे आणि दीपक पवार यांनी मार्गदर्शन केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा