छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सेंट्रल ट्रेनिंग व प्लेसमेंट सेल, राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिकी एवं सूचना प्रौद्योगिकी संस्थान (नायलिट) व मॅनयुनायटेड यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (१८ मार्च) महानोकरी अभियानचे (मेगा जॉब फेअर) आयोजन करण्यात आले आहे.

छत्रपती संभाजीनगर, पुणे आणि मुंबई येथील नामांकित कंपन्या या महानोकरी अभियानात सहभागी झाल्या असून विविध पदविका, पदवी तसेच पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांकरिता नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती संयोजक डॉ. गिरीश काळे यांनी दिली.

१८ मार्च २०२५ रोजी सकाळी ठीक ९ वाजेपासून नाव नोंदणी सुरु करण्यात येणार आहे. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर मुलाखती घेतल्या जातील. या संदर्भातली कंपन्यांची व रिक्त पदांची सर्व माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील ट्रेनिंग व प्लेसमेंट सेलच्या लिंकवर देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. मुलाखतीसाठी किमान पाच परिचय पत्राच्या प्रती (बायो डेटा) घेऊन उपस्थित राहण्यासाठी कळवल्याचे असे डॉ. गिरीश काळे, के. लक्ष्मण व मॅनयुनायटेड कोर्पोरेटचे रवींद्र कंगराळकर यांनी सांगितले.

छत्रपती संभाजीनगर येथील साई इलेक्ट्रिकल, बडवे इंजिनिअरिंग, कार्ल्सबर्ग इंडिया, पर्किन्स इंडिया,ऋचा इंजिनिअर्स, लाईफलाईन डिव्हाइसेस प्रा. लि., आयसीआयसीआय, ॲक्सिस बँक, यशश्री प्रेस, मेडी-रिक्रुटर्स, कल्याण ज्वेलर्स, अल्ट्रा ब्युटी केअर, तसेच ‘आयटी’ ची मागणी असलेल्या शार्कवेब आयटी, इंडियन इंटरनेट सोल्युशन्स प्रा. लि. तसेच वेलविन पॅकेजिंग, सोडेस्को इंडिया, एस. डब्ल्यू मल्टिमीडिया, इन्फिनिटी टेक रिसोर्सेस तसेच इम्फासिस यासह इतरही अशा प्रख्यात ३५ कंपन्या ८०० तरुणांना रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी सहभागी होणार आहेत, अशी माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली.

Story img Loader