छत्रपती संभाजीनगरः  एका लॉजमध्ये आंतरराज्यीय महिलांकडून देह व्यापार करून घेणाऱ्या टोळीस चिकलठाणा पोलिसांनी पकडले. जालना रोडलगतच्या झाल्टा फाट्यावर मंगळवारी रात्री  दामिनी पथकाने डमी ग्राहक पाठवत योगेश लॉज ॲन्ड बोर्डींगमध्ये सुरू असलेल्या या रॅकेटमधील पती पत्नीसह सहा तरुणींना ताब्यात घेतले. पकडलेल्या तरूणींमध्ये दोघी  गुजरातमधील आहेत.

देहव्यापार चालविणाऱ्या योगेश तुकाराम भुमे व मीराबाई योगेश भूमे (रा. हनुमाननगर छत्रपती संभाजीनगर) या पती पत्नीला पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 61 हजार 310 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देहव्यापार विरोधी पथकाने ही कारवाई केली. दामिनी पथक प्रमुख एपीआय आरती जाधव यांच्या पथकातील एपीआय आरती जाधव, महिला हवालदार मंगल पारधे, पोह सुरेश सोनवणे, पोना सोनवणे आदींचा या कारवाईत सहभाग होता.

Story img Loader