छत्रपती संभाजीनगर : शेतमालाचे घसरलेले दर, दुष्काळ, गारपीट यामुळे मराठवाडा व अमरावती विभागात गेल्या २४ वर्षांत तब्बल ३० हजार ७२७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. असे असताना अनेक उमेदवारांनी आपल्या शपथपत्रांमध्ये उत्पन्नाचा मुख्य स्राोत शेती असल्याचे नमूद करून संपत्तीची आकडेवारी मात्र कोटींच्या घरात नोंदविली आहे.

मराठवाड्यातील ४६ मतदारसंघांमध्ये प्रमुख उमेदवारांनी आपला मुख्य व्यवसाय शेती असल्याचे उमेदवारी अर्ज भरताना दिलेल्या शपथपत्रांमध्ये म्हटले आहे. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी उत्पन्न स्राोत शेती असल्याचे नमूद केले आहे. त्यांचा २०२३-२४ मध्ये आयकर विभागाकडे ६९ लाख ८८ हजार ७८० रुपयांचे उत्पन्न दर्शविले आहे. माजी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेती, व्यापार, आमदारांचे मानधन, भाडे या उत्पन्नातून मिळविलेल्या संपत्तीचे बाजारमूल्य, त्यांची संपत्ती सहा कोटी ८५ लाख २७ हजार ६०१ रुपयांची असल्याचे नमूद केले आहे. अनेक कंपन्यांमध्ये भागीदारी आणि समभाग असणारे काँग्रेसचे नेते अमित देशमुख यांनीही आपला उत्पन्नस्राोत शेती असल्याचे लिहिले आहे. राजेश टोपे, राणा जगजितसिंह पाटील यांचे उत्पन्नही शेतीतूनच आहे. खासदार संदीपान भुमरे यांचे चिरंजीव विलास भुमरे यांनी मद्याविक्रीचा व्यवसाय असल्याचे नमूद केलेले असून संजय शिरसाट यांनी आपण ‘विकासक’ असल्याचे लिहिले आहे. शेती जर फायद्याची असती तर एवढ्या आत्महत्या झाल्या असत्या का? करमुक्त उत्पन्न दाखविण्यासाठी बाजार समितीमधून पावत्या मिळवून फसवाफसवी केली जात असल्याचा आरोप या विषयाचे अभ्यासक शहाजी नरवडे यांनी केला आहे.

Bullet Train Bridge Collapse in Anand Gujarat
Bullet Train Bridge Collapse : बुलेट ट्रेन प्रकल्पाचा पूल कोसळला, तीन मजूर ठार; ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकले, बचावकार्य जारी
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
loksatta editorial Supreme court verdict on madrasa
अग्रलेख: मदरसे ‘कबूल’
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Maharashtra Assembly Election 2024 _ BJP
Assembly Election: भाजपाने अखेर बंडखोरांना हिसका दाखवला; ४० नेत्यांवर उगारला कारवाईचा बडगा
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: जागतिक महासत्तेच्या चाव्या पुन्हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या ताब्यात; अमेरिकेत मोठ्या विजयासह सत्तारूढ होणार!
Ashish Shelar Raj Thackeray
Ashish Shelar : अमित ठाकरेंनंतर भाजपाचा मनसेच्या आणखी एका उमेदवाराला पाठिंबा, कंबर कसून प्रचार करण्याचे आदेश
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

हेही वाचा >>>ठाकरेंच्या बंडखोराची माघार, काँग्रेसऐवजी भाजपा सुखावली, अतुल सावेंनी थेंट खैरेंचे पाय धरले; औरंगाबादमध्ये काय घडतंय?

शेतकरी आत्महत्यांचा आलेख

मराठवाडा

● २००१ ते २०२४ या काळात ११,५१८ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

● ८४४० शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक लाखाची मदत

● यंदा सप्टेंबरपर्यंत ६६८ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

अमरावती विभाग

● २००१ ते २०२४ या काळात २०,७७२ शेतकरी आत्महत्या केल्या.

● यंदा जानेवारी ते ऑगस्टदरम्यान ६९८ आत्महत्या

Story img Loader