बीड : ‘वयाच्या ७२ वर्षी आपल्याला बंदूक कशाला हवी,’ या प्रश्नावर येणारे ‘राहू द्या ना साहेब. हात-पाय चाललेत तोवर चालवतो’, हे उत्तर. बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात सध्या अशा प्रकारचे संवाद अनेकदा ऐकायला मिळत आहेत. घाऊक पद्धतीने दिलेल्या शस्त्र परवान्यावर ओरड सुरू झाल्यानंतर घेण्यात येणाऱ्या सुनावणीदरम्यान पिस्तूल हे संरक्षणाचे नव्हे तर सत्ता, श्रीमंती, वर्चस्व मिरवण्यासाठीच्या हौसेचे प्रतीक असल्याचे दिसून आले. पण केवळ बीडच नव्हे तर अवघ्या मराठवाड्यात ही हौस जपली जात असल्याचेही उघड होते.

बीड जिल्ह्यात १ हजार २२२ शस्त्रास्त्र परवानाधारक आहेत. त्यातील अनेकांना परवाना आवश्यकच आहे का, याची खातरजमा करून कारवाई करत असल्याचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. घाऊकपणे दिलेल्या शस्त्र परवान्यांमध्ये तपासणीअंती ११७ बंदुका कार्यान्वित नाहीत. १६ परवाने बँकांच्या सुरक्षेसाठी तैनात आहेत. इतर सर्व परवान्यांमध्ये काही जणांची गरज म्हणून परवाने देण्यात आले आहेत. ‘ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत, अशा व्यक्तींचे परवाने पुन्हा तपासण्याचे काम सुरू झाले आहे. काही वेळा पोलीस यंत्रणेकडून आलेले प्रस्तावही पुरेशी तपासणी करून आलेले नसल्याने रद्द केलेले होते,’ असे दावे प्रशासन करते. पण दुसरीकडे सरकारी कार्यालयांत पिस्तूल, रिव्हॉल्वर घेऊन सहज वावरणारे कार्यकर्ते पाहायला मिळतात.

Two hundred acres of farmland damaged by rangava in Shirala
शिराळ्यात गव्यांकडून दोनशे एकर शेतीचे नुकसान
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
BMC chief inspects development works in Borivali
विकासकामांच्या गुणवत्तेवर अधिक भर द्यावा; पालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे अधिकाऱ्यांना आदेश
Satish Wagh murder case, Satish Wagh Wife ,
सतीश वाघ खून प्रकरणात पत्नी सामील, मारेकऱ्यांना पाच लाखांची सुपारी; पत्नी गजाआड
Dhananjay Munde. Ajit Pawar , Maratha Kranti Morcha,
धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची अजित पवारांकडे मागणी, मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने निवेदन
death of young man walking with a Jain Sadhvi in accident
जैन साध्वी सोबत चालत जाणाऱ्या युवकाचा अपघाती मृत्यू
Crime News
Crime News : क्रौर्याचा कळस! सुनेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये सासऱ्यांनी मिरची पावडर टाकली, सासूने दिले रॉडचे चटके; कुठे घडली घटना?
Santosh Deshmukh Murder Case
Santosh Deshmukh Murder : संतोष देशमुख यांच्या मुलीचा टाहो; “माझ्या वडिलांना जसं ठार केलं, तशीच कठोर शिक्षा…”

हेही वाचा : वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!

बंदूक असली की राजकीय पटलावर कार्यकर्त्याचे ‘मोठे’पण वाढते, असा समज आहेच; पण सत्ता आणि श्रीमंती दाखवण्याची हौस म्हणूनही शस्त्राची संगत केली जाते. चारचौघांत बोलताना किंवा सार्वजनिक ठिकाणी फिरताना सहज शर्ट वर करून कंबरेला पिस्तुलाचे दर्शन घडवणारे कैक आहेत. यात सगळेच. परळीमध्ये एक वारकरीसुद्धा कंबरेला रिव्हॉल्व्हर लावून टाळकरी म्हणून उभा राहतो. व्यापारी, उद्याोजक यांसह राजकीय कार्यकर्त्यांकडे कोणत्या कंपनीची रिव्हॉल्व्हर आहे, ही चर्चा अगदीच सहज होते. साधारणत: १ लाख ३० हजार ते तीन लाख आणि त्यापुढे सात लाख रुपयांपर्यंत पिस्तुलाची चर्चा असते.

गोदावरी नदीच्या पट्ट्यातील ८५ किलोमीटरच्या परिसरात बीड जिल्ह्यात हे प्रमाण अधिक आहे. मागास म्हणून ऊसतोडणीसाठी जाणाऱ्या सहा लाख मजुरांच्या जिल्ह्यातील राजकीय पटलावरील बंदूक हौस आता पुन्हा चर्चेत आली आहे. परवानाधारक शस्त्राने फारसे गुन्हे होत नाहीत. मात्र, गावठी कट्टे आता वाढत असल्याचे निरीक्षण एका वरिष्ठ अधिकाऱ्याने आवर्जून नोंदवले.

हेही वाचा : गोदावरी पाणीवाटपासाठी नवे सूत्र? धरण भरण्याची अट ६५ टक्क्यांवरून ५७ वर आणण्याची शिफारस

मागास मराठवाड्यातील शस्त्रांची संख्या

छत्रपती संभाजीनगर (शहर) – १ हजार ८२

छत्रपती संभाजीनगर (ग्रामीण) – ५१२

लातूर – ८००

जालना – ६५२

हिंगोली – २००

नांदेड- १ हजार १३९

परभणी- ७९७

धाराशिव – १ हजार ३३

हेही वाचा : लहरी हवेचा फळबागांना फटका

हत्येच्या तपासासाठी विशेष चौकशी पथक

मुंबई : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येचा तपास करण्यासाठी राज्य शासनाने उपमहानिरीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या विशेष तपास पथकामध्ये (एसआयटी) नऊ अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या गृह खात्याने बुधवारी केल्या आहेत. या हत्येचा तपास करण्यासाठी एसआयटीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली होती. आता या एसआयटीमध्ये उपअधीक्षक (बीड गुन्हा अन्वेषण विभाग) अनिल गुजर, बीडच्या गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयसिंग जोनवाल , उपनिरीक्षक महेश विघ्ने व तुळशीराम जगताप, केज पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक आनंद शिंदे, बीड गुन्हे शाखेतील हवालदार मनोज वाघ, केज पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक चंद्रकांत काळकुटे, बाळासाहेब अहंकारे, शिपाई मनोज गित्ते यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Story img Loader