लोकसत्ता प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर : आठवडाभराच्या विश्रांतीनंतर शनिवारी व रविवारी जिल्ह्यात विविध भागात पाऊस परतला. रविवारी सायंकाळी विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला असून सिल्लोड तालुक्यातील शिसारखेडा येथे वीज पडून माय-लेकीचा मृत्यू झाला. रेणुका हरिदास राऊत व स्वाती हरिदास राऊत, अशी मृत मायलेकींची नावे आहेत.

walmart indian girl death
कॅनडात वॉलमार्टमधील वॉक इन ओव्हनमध्ये आढळला शीख तरुणीचा मृतदेह
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
Three laborers died after a water tank collapsed in Pimpri Chinchwad
Pune Water Tank Collapse : पिंपरी- चिंचवडमध्ये पाण्याची टाकी कोसळून पाच कामगारांचा मृत्यू; ७ गंभीर जखमी
dombivli school boy died
डोंबिवलीत टेम्पोच्या धडकेत शाळकरी विद्यार्थ्याचा मृत्यू, एक विद्यार्थी गंभीर जखमी
Woman poisons boyfriend thinking he would inherit ₹252 crore.
Woman poisons Boyfriend : २५२ कोटींसाठी बॉयफ्रेंडवर विषप्रयोग, हत्या झाल्यानंतर गर्लफ्रेंडवर पश्चातापाची वेळ! नेमकं काय घडलं वाचा
boyfriend died by heart attack
“तिला वाचवा, ती मरेल”, एवढं बोलून प्रियकर कोसळला; रक्ताच्या थारोळ्यात प्रेयसीला पाहून प्रियकराचा ओढवला मृत्यू!
College youth drowned Khamboli lake, Khamboli lake, Mulshi,
मुळशीतील खांबोली तलावात बुडून महाविद्यालयीन तरुणांचा मृत्यू
Kiccha Sudeep Mother Pass Away
कन्नड सुपरस्टार किच्चा सुदीपच्या आईचं निधन, वयाच्या ८६व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

छत्रपती संभाजीनगरमध्ये आठवडाभरापासून पावसाने विश्रांती घेतली होती. वातावरणात उकाडाही उन्हाळ्यासारखाच निर्माण झाला होता. घामाच्या धारांनी नागरिक हैराण झाले होते. पावसाच्या परतण्याकडे लक्ष लागले होते. अखेर शनिवारी सकाळी अचानकपणे हलका, मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. रविवारी सायंकाळी ४ ते ४.३० असा अर्धा तास शहराच्या अनेक भागात जोरदार पाऊस झाला. अनेक भागात गडगडाटासह पाऊस पडला. पावसानंतरही वातावरणात उकाडा कायम होता.

आणखी वाचा- वैजापूर, गंगापूर येथे धार्मिक भावना दुखावल्याच्या कारणावरून टायर जाळून रास्ता रोको, जोरदार निदर्शने

सिल्लोड तालुक्यातील शिसारखेडा येथे रविवारी सायंकाळी विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. या दरम्यान शिवार गट नं. ३० मधील स्वत:च्या शेतात मुगाच्या शेंगा तोडत असताना सायंकाळी ५.३० च्या सुमारास एक जोरदार वीज कडाडली. यामध्ये रेणुका हरिदास राऊत (वय ३८) व स्वाती हरिदास राऊत (१८) या दोघी मायलेकींचा मृत्यू झाला.

मराठवाड्याच्या अनेक भागातही जोरदार पाऊस झाला. बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात शनिवारी झालेल्या पावसाने मांजरा, साळ नदीला पूर आला. नदी पात्रालगतच्या शेतातील पिके वाहून गेली. अनेक घरांमध्ये पाणी शिरले. पाटोदा महसूल मंडळात ७१.५ मिमी पावसाची नोंद झाली. महासांगवी तलावातून १० हजार ५०० क्युसेस वेगाने मांजरा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. आष्टी तालुक्यातील कडी नदीला शनिवारी झालेल्या पावसाने पूर आला. पुन्हा एकदा पूल वाहून गेला. यापूर्वी ९ जुलै रोजीही पूल पावसामुळे वाहून गेला होता.