डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण; सीबीआय अधिकाऱ्यांची तक्रार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने अटक केलेला औरंगाबाद येथील आरोपी सचिन अंदुरे याने दिलेल्या माहितीच्या आधारे गावठी पिस्टल, तीन काडतुसे व कुकरी आदी शस्त्रसाठा बाळगल्याप्रकरणी मंगळवारी रात्री अटक केलेल्या तिघांना बुधवारी सायंकाळी न्यायालयात हजर केले असता प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एच. एस. पुराडउपाध्ये यांनी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग, बेलापूर, नवी मुंबईचे उपअधीक्षक मारुती शंकर पाटील यांनी मंगळवारी रात्री सिटी चौक पोलीस ठाण्यात सचिन अंदुरेचा मेव्हणा शुभम सूर्यकांत सुरळे, अजिंक्य शशिकांत सुरळे व रोहित राजेश रेगे यांच्याविरुद्ध शस्त्र, दारूगोळा असे घातक साहित्य बाळगल्याच्या प्रकरणात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मारुती पाटील यांच्या तक्रारीनुसार डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाच्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या तपासात अटक केलेला सचिन अंदुरे याने एक पिस्टल मेव्हणा शुभम याच्याकडे सुरक्षितरीत्या लपवून ठेवल्याचे सांगितले. त्याआधारे मारुती पाटील, केंद्रीय अन्वेषणचे पोलीस जितेंद्र कचरे, अरिवद कोळेकर, आटोळे, कुंभार व दहशतवाद विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर व त्यांच्या सहकाऱ्यांनी औरंगपुरा येथे छापा टाकला असता शुभम याने सचिनला अटक केल्याची माहिती कळल्यानंतर पिस्टल चुलतभाऊ अजिंक्य याच्याकडे लपवून ठेवण्यासाठी दिल्याचे सांगितले. तर अजिंक्य याने धावणी मोहल्ल्यात राहणारा रोहित रेगे याच्याकडे दिल्याचे सांगितले. रोहितच्या घरात छापा मारला असता तेथे काळ्या रंगाची पिस्टल, तीन ७.६५च्या जिवंत काडतुस, एक पॉकीट, प्लास्टिक कॅरीबॅग ज्यावर सचिन अंदुरे काम करीत असलेल्या दुकानाचे नाव असून एक कुकरी, काळ्या रंगाची एअर पिस्टल, एक रिकामी गोणी, दोन मोबाइल, एक तलवार आदी साहित्य बेकायदेशीररीत्या बाळगल्याचे समोर आले. याप्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तिघांनाही प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एच. एस. पुराडउपाध्ये यांच्यासमोर हजर करण्यात आले.

आरोपींचे वकील बलराज कुलकर्णी व वर्षां घाणेकर यांनी जामिनासाठी केलेल्या युक्तिवादात आरोपी हे विद्यार्थी असून त्यांच्या भवितव्याचा विचार व्हावा, शिवाय त्यांच्याकडील शस्त्रसाठाही हस्तगत केलेला आहे, असे सांगितले. तर सरकारी वकील भाग्यश्री संचेती, बालाजी गवळी यांनी गुन्ह्य़ाचे गांभीर्य ओळखावे, राजस्थान उच्च न्यायालयातील अनिलकुमार जैन व इतरांच्याबाबत दिलेल्या निर्णयाचे उदाहरण देऊन आरोपींना पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. न्या. पुराडउपाध्ये यांनी तिन्ही आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.