औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) महिलेची जिन्यावरच प्रसूती झाल्याने बाळाचा मृत्यू झाल्याप्रकरणी दहा जणांना नोटीस पाठवण्यात आली आहे. यात तीन महिला डॉक्टर, ३ परिचारिका व ४ चतूर्थीश्रेणी कामगारांचा समावेश असून या नोटीसला उत्तर देण्यासाठी सोमवारपर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

छावणी परिसरातील एक महिला तिसऱ्या वेळी प्रसूतीसाठी घाटीमध्ये सोमवारी मध्यरात्री दाखल झाली होती. तिला प्रसूती कळा सुरू होत्या, पण प्रसूती विभागाकडे नेण्यासाठी तेथे स्ट्रेचर उपलब्ध नव्हते. त्यामुळे ती महिला चालतच तिसऱ्या मजल्यावर निघाली. प्रसूती विभागाच्या दिशेने जात असताना एका मजल्यावरील पायऱ्या चढत असतानाच मध्येच ती महिला बसली आणि तेथेच एक अस कळा आल्याने ती प्रसूत झाली. तिचे नवजात बाळ दगावले. तिला वेळेत स्ट्रेचर उपलब्ध झाले असते तर बाळ वाचले असते, असे नातेवाईकांचे म्हणणे आहे.

या प्रकरणी रुग्णालय प्रशासनाने चौकशी समिती नेमली होती. घटना घडली त्या रात्री कोणते डॉक्टर आणि कर्मचारी होते ? याबाबत चौकशी करुन त्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. १० जणांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून पुढील कारवाई सोमवारी कर्मचाऱ्यांनी उत्तर दिल्यावर केली जाईल, असे डॉ. कैलास झिने यांनी सांगितले.