औरंगाबाद स्मार्ट सिटी होत असतानाच जालना शहरातही सिडको नवीन शहर वसवत आहे. जालना येथील तंत्रनिकेतनच्या मागे नवीन जालना शहरासाठी ३ हजार कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. येथील जमीन संपादनास सकारात्मक प्रतिसाद दिल्याने हा प्रकल्प लवकरच सुरू केला जाणार आहे. सिडकोचे मुख्य प्रशासक सुनील केंद्रेकर व इतर अधिकाऱ्यांची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत आवश्यक त्या प्रमाणात पाणीपुरवठा होऊ शकतो का, याची चाचपणी करण्यात आली.
जालना शहर मराठवाडय़ातील प्रमुख बाजारपेठेचे शहर मानले जाते. शहरातील लोकसंख्या तीन लाखांपेक्षा अधिक झाली असून तेथे ‘अ’ वर्ग नगरपालिका आहे. उद्योगासाठी ड्रायपोर्टची घोषणा झाल्यानंतर जालन्याच्या विकासाला हातभार लागावा, या अनुषंगाने सिडकोनेही नवीन शहरासाठीचा प्रस्ताव सकारात्मक पद्धतीने पुढे सरकवण्याचे ठरविले आहे. खातगाव, निधोना, मांडवा या तीन गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या जाणार आहेत. शेतकऱ्यांना अधिक चांगला मोबदला देतानाच इतर सुविधाही दिल्या जाणार आहेत. या नवीन शहरासाठी लागणाऱ्या पाण्याची व्यवस्था कोणत्या स्रोतातून करता येईल, याबाबतची चाचपणी नुकतीच करण्यात आली. मुख्य प्रशासक सुनील केंद्रेकर यांनीच या प्रकल्पात लक्ष घातले असल्याने तो वेगाने मार्गी लागेल, असे सांगितले जाते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा