देशभर डाळींच्या दरवाढीचा मुद्दा गाजत असताना पुरवठा अधिकाऱ्यांच्या आदेशावरून जिल्ह्यात विविध ठिकाणी गोदामांवर तहसीलच्या पथकाने बुधवारी छापे टाकले. परंतु पथकाला कोठेही मर्यादेपेक्षा अधिक प्रमाणात डाळींचा अवैध साठा सापडला नाही.
डाळींचे भाव गगनाला भिडल्याने सामान्य जनता चांगलीच त्रस्त झाली. डाळींच्या दरवाढीवरून विरोधकांनी विविध ठिकाणी सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न सुरू केला. तसेच सर्वत्र डाळींच्या दरवाढीवरून रणकंदन पेटले. या पाश्र्वभूमीवर जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्य़ात १४ पथके स्थापन केली. पथकांनी जिल्ह्यात तब्बल ५२ ठिकाणी छापे टाकून साठे तपासले.
जिल्ह्यात डाळींची साठेबाजी थांबविण्यास गेलेल्या पथकांनी टाकलेल्या छाप्यांमध्ये तूरडाळ १८ हजार ६४५ क्विंटल, मूग ४ हजार ५६९ क्विंटल, हरभरा डाळ ७ हजार ४५८ क्विंटल, उडीद डाळ २ हजार ६४९ क्विंटल, खाद्यतेल ५ हजार ८९६, तर इतर ४ हजार ७५९ क्विंटल धान्यसाठा असल्याचे आढळून आले. मात्र, पथकांना कोठेही मर्यादेपेक्षा अधिक साठा सापडला नाही.
िहगोलीत ८ ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये तूर ७३२ क्विंटल, मूग ०.७ क्विंटल, हरभरा २ हजार ६८२ क्विंटल, उडीद ७ क्विंटल साठा आढळून आला. औंढा नागनाथ येथे तीन पथकांनी १४ ठिकाणी छापे टाकले. खोदा पहाड.. निकला चूँहा. अशी पथकांची यामुळे गत झाल्याचे बोलले जात आहे. कळमनुरी व वसमतमध्येही बऱ्यापकी साठा असल्याचे दिसून आले.
जिल्ह्य़ात ५२ छाप्यांमध्ये कोठेही अवैध साठा नाही!
देशभर डाळींच्या दरवाढीचा मुद्दा गाजत असताना पुरवठा अधिकाऱ्यांच्या आदेशावरून जिल्ह्यात विविध ठिकाणी गोदामांवर तहसीलच्या पथकाने बुधवारी छापे टाकले.
Written by बबन मिंडे
First published on: 24-10-2015 at 01:20 IST
Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No illegal stock in 52 raid