हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मागणी आणि पुरवठय़ाची साखळी विस्कळीत; दरवाढीची शक्यता
निश्चलनीकरणानंतर राज्यातील मालवाहतुक ४० टक्क्य़ांनी घटली असून मागणी आणि पुरवठय़ाचे गणित येत्या काही दिवसांत पूर्णत: कोलमडेल, असा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री कार्यालयास पाठवला आहे. यामुळे अन्नधान्य महाग होण्याची भीती निर्माण झाली आहे.
मराठवाडय़ातून होणाऱ्या मालवाहतुकीचा अहवाल नुकताच देण्यात आला असून उमरगा सीमावर्ती नाक्यावरून ४० टक्के, तर नांदेडमधून मालवाहतुकीमध्ये ३० टक्के घसरण झाली आहे. परिणामी जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढू शकतात किंवा माल आला नाही म्हणून व्यापारी मनमानीही करू शकतात. मराठवाडय़ातल्या कृषी उत्पन्न बाजार समितीत ३० ते ३५ टक्के धान्याची आवक कमी झाली आहे. लातूरमध्ये १ ते ८ नोव्हेंबर या कालावधीत २ लाख ७ हजार ८७९ क्विंटल (पान ८ वर)
अन्नधान्य पुरवठय़ावर परिणाम
महाराष्ट्रात ३० लाख मालमोटारी आहेत. पेट्रोकार्डसह जरी वाहनचालकाला पाठवायचे असले, तरी किमान ३० ते ४० हजार रुपये रोखीने वाहतूक ठेकेदार देतात. यामध्ये टोल, माल चढविणे आणि उतरविणे यासाठी बराच खर्च येतो. नोटा नसल्यामुळे मालवाहतूक विस्कळीत झाली आहे. याचा परिणाम अन्नधान्य पुरवठय़ावर होऊ शकतो. नांदेड आणि उमरगा येथील सीमावर्ती नाक्यांवर वाहतुकीत घट झाल्याची आकडेवारी परिवहन आयुक्तांपर्यंत देण्यात आली आहे.