छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव या दोन जिल्ह्यांच्या नामांतराची कार्यवाही शनिवारी पूर्ण झाली असल्याची अधिसूचना राज्य सरकारने काढली आहे. मराठवाडा मुक्तिसंग्रामच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित मंत्रिमंडळ बैठकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेली अनेक वर्षे शहराचे आणि जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजीनगर करावे यासाठी बरेच प्रयत्न झाले होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या शहरास संभाजीनगर म्हणण्यास सुरुवात केली. एकनाथ शिंदे आणि फडणवीस सरकारच्या काळात त्यास ‘छत्रपती संभाजीनगर’ असे संबोधण्याचा निर्णय झाला. मात्र न्यायालयीन प्रक्रिया आणि अधिसूचना काढताना झालेल्या चुकीमुळे केवळ शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर झाले. मात्र, जिल्हा आणि विभाग ‘औरंगाबाद’च राहिला. आता नव्या अधिसूचनेमुळे जिल्हा आणि विभागाचे नावही छत्रपती संभाजीनगर असे झाले असून उस्मानाबादचे नावही धाराशिव असे झाले असल्याचे अधिसूचनेत नमूद आहे.

औरंगाबाद शहरासह जिल्ह्याचं नामकरण पूर्ण (अधिसूचना)
उस्मानाबाद शहरासह जिल्ह्याचं नामकरण करण्याबाबतची अधिसूचना

औरंगाबाद व उस्मानाबाद ही दोन्ही नावे बदलण्यामागे हिंदू मतपेढी आपल्या बाजूने यावी, असा सरकारचा प्रयत्न आहे. महाविकास आघाडीच्या काळात सरकार गडगडत असताना मंत्रिमंडळाच्या शेवटच्या बैठकीत शहराचे नाव बदलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, ती मंत्रिमंडळ बैठकच अवैध असून नव्याने औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशिव असे करण्यात आले.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Now aurangabad city and district name will be chhatrapati sambhajinagar osmanabad as dharashiv govt notification rmm
Show comments