समतानगर भागात सर्वाधिक रुग्ण

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील करोनाबाधितांची संख्या आता पन्नाशीच्या पुढे गेली आहे. सोमवारी पहाटेच्या सुमारास आणखी दोन जणांचे अहवाल करोना चाचणीला सकारात्मक आले. समतानगर आणि असेफिया कॉलनी या भागातील दोघी जणींना लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, सर्वाधिक रुग्ण समतानगर भागात सापडले असून या भागात आता नऊ रुग्ण झाले आहेत. शहरातील करोनाबाधितांची संख्या ५१ वर पोचली आहे.

गेल्या आठवडय़ापासून शहरातील विविध भागात रुग्ण आढळून येत आहेत. भावसिंगपुरा भागातील भीमनगर भागातील एका महिलेच्या मृत्यूनंतर करोना चाचणी सकारात्मक आली होती. या महिलेच्या अंत्ययात्रेस १०० हून अधिक जणांची गर्दी होती. त्यामुळे अनेक जणांच्या मनात भीती होती. मात्र, रविवारी पहाटे समतानगर आणि असेफिया कॉलनीतील दोन महिलांची चाचणी सकारात्मक आली. किलेअर्क परिसरातही शनिवारी करोनारुग्ण आढळल्याने प्रशासन हैराण झाले होते. असे असले तरी शहरात आज पुन्हा गर्दी झाली होती. रमजानपूर्व खरेदीसाठी तसेच भाजी व फळे घेण्यासाठी गर्दी होत असल्याने लोकांना आजाराची गंभीरता समजावून कशी सांगावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. २२ जणांची प्रकृती ठणठणीत झाल्याने त्यांना घरी पाठविण्यात आले असले तरी दोन जणांची भर पडत असल्याने चिंता वाढली आहे. सध्या जिल्हा रुग्णालयात २०, तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात चार रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी यांनी दिली.

क्ष- किरण यंत्राची मागणी

करोनाबाधितांच्या काही प्रकरणामध्ये संपर्कातील व्यक्ती कळत नसल्याने प्रशासनासमोरील चिंता वाढू लागली आहे. औरंगाबाद शहरातील किलेअर्क परिसरातील पंचकुला आणि नूर कॉलनीतील या  परिसरातील नव्याने दाखल झालेल्या दोन रुग्णांकडून काहीच माहिती मिळत नसल्याचे सूत्रांनी सांगितले. लातूर येथील मृत महिलेचेही संपर्क मिळत नसल्याने प्रशासन हैराण झाले आहे. दरम्यान रविवारी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात करोना लढय़ाचा आढावा घेतला. काही जिल्ह्यांमध्ये छोटय़ा आकाराच्या ‘एक्स- रे’ मशीन देण्याची मागणी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी नोंदविली आहे.

औरंगाबाद शहरातील किलेअर्क परिसरातील दोन वृद्धांना करोना लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर संपर्कातील व्यक्ती कोण, याचा शोध महापालिकेच्या वतीने सुरू करण्यात आला. मात्र, आम्ही कोठे घराबाहेर गेलो नव्हतो, असे उत्तर येत असल्याने अडचणी वाढल्या आहेत. कदाचित एखादा करोनाबाधित रुग्ण या वृद्धांच्या संपर्कात गेला असावा, असा अंदाज असल्याने त्यांच्या भोवतीच्या व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आल्याची माहिती डॉ. नीता पाडळकर यांनी दिली. संपर्कातील व्यक्तींची नावे किंवा माहिती देताना सुरुवातीच्या काळात बहुतांश रुग्ण खळखळ करतात. नंतर मात्र, माहिती पुढे येत राहते. तसेच या प्रकरणांमध्येही होईल, असा अधिकाऱ्यांचा अंदाज आहे. दरम्यान शहरातील करोनाबाधितांची संख्या नियंत्रणात राहावी म्हणून प्रतिबंधित क्षेत्रातील टाळेबंदी अधिक कडक केली जाणार आहे.

पीपीई कीटचीही मागणी

शहरातील ज्या भागात रुग्णसंख्या अधिक आहे, त्या भागात टाळेबंदी अधिक  कडक करण्याच्या सूचना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिल्या आहेत. जिल्हा रुग्णालय, तसेच वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील अडचणींबाबतही त्यांनी चर्चा केली. त्यांच्याकडे पीपीई कीटची मागणी अधिकाऱ्यांनी नोंदवली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

टँकरच्या पाण्यासाठी गर्दी नको

राज्यातील ग्रामीण भागात पाणीटंचाई जाणवत असून अनेक ठिकाणी पाणी घेताना गर्दी होताना दिसून येत असल्याने पाणी घेताना योग्य अंतर पाळण्याच्या सूचना द्याव्यात, असे पत्र राज्याचे अवर सचिव गणेश पवार यांनी जिल्हाधिकारी व मुख्याधिकाऱ्यांना दिले आहे. मराठवाडय़ात सध्या ७८ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. सर्वाधिक टँकर औरंगाबाद जिल्ह्यात आहेत.

दलालांपासून सावध राहण्याची सूचना

करोनाच्या पार्श्वभूमीवर बांधकाम मजुरांसाठी सरकारकडून केली जाणारी मदत थेट बँक खात्यात होणार असली तरी काही दलाल रक्कम मिळवून देतो, म्हणून फिरत असल्याने दलालापासून सावध राहावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.