शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त औरंगाबाद महापालिकेकडून आजपासून मोफत अंत्यविधी योजनेला सुरुवात करण्यात आली. या योजनेंतर्गत प्रत्येक अंत्यसंस्कारामागे स्मशानजोगींना २००० रुपये मानधनही देण्यात येणार आहे. महापौर नंदू घोडेले यांनी ही माहिती दिली.
महापौर घोडेले म्हणाले, मोफत अंत्यसंस्काराचा लाभ घेणे हा ऐच्छिक भाग आहे. त्यामुळे गरीबांना या योजनेचा फायदा घेता येईल. तसेच अंत्यसंस्कारावेळी शवपेटीही महापालिकेकडून उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. याआधीही पंधरा वर्षांपूर्वी ही योजना भाजपाचे महापौर संजय जोशी यांनी सुरु केली होती. पण एक वर्षातच ही योजना बंद पडली होती.
दोन दिवसांपूर्वी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सर्व सदस्य पदाधिकार्यांनी या निर्णयाची अंमलबजावणी पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ती पुन्हा कार्यन्वीत करण्यात आली आल्याचे घोडेले यांनी सांगितले.