लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून नेतेमंडळी जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी वेगवेगळया क्लुपत्या लढवत आहेत. विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेही याला अपवाद नाहीत. धनजंय मुंडे यांनी सकाळच्या मॉर्निंग वॉकची संधी साधून थेट मतदारांशी संपर्क साधला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

त्यांनी शनिवारी सकाळी ‘टॉक विथ मॉर्निंग वॉक’द्वारे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बीड लोकसभेचे उमेदवार बजरंगबप्पा सोनवणे यांचा प्रचार केला. मागील दोन दिवसांपासून परळी शहरातील नागरिकांच्या भेटी-गाठीसाठी जनसंपर्क अभियान राबवणार्‍या मुंडे यांनी शनिवारी सकाळी परळीच्या विश्रामगृहाच्या डोंगर परिसरात मॉर्निंग वॉकसाठी येणार्‍या नागरिकांची साडेसहा वाजता भेट घेतली.

परळीच्या विविध मुद्यांवर चर्चा करताना भाजपा खासदार, आमदारांच्या अपयशाचा पाढा वाचताना परळी शहरासाठीचे आपले विकासाचे व्हिजनही मतदारांसमोर मांडले. परळीला विकासाची प्रसन्न पहाट पहायची असेल तर लोकसभेच्या निवडणुकीत बजरंग सोनवणे यांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: On morning walk ncp leader dhananjay munde talk with voters