डांस बार बंदीच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात मत मांडण्यास सरकार कमी पडले तर या विरोधात वेळप्रसंगी रस्त्यावर उतरू, असा इशारा माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या कन्या स्मिता पाटील यांनी दिला. औरंगाबाद येथे देवगिरी महाविद्यालयात ‘डान्सबार बंदी’  या विषयावर त्यांनी संवाद साधला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाऊसाहेब पाटील चिकटगावकर होते. व्यासपीठावर आमदार सतीश चव्हाण, सुभाष झांबड, विनोद पाटील यांची उपस्थिती होती.
केवळ आर. आर. पाटील मुलगी आहे म्हणून नव्हे, तसेच वडिलांनी घेतलेला धाडसी निर्णय म्हणून डान्सबार बंदीच्या समर्थनार्थ उतरले नाही तर हा निर्णय समाज उपयोगी होता आणि आहे. त्यामुळे त्या निर्णयाच्या पाठीशी उभे राहणे प्रत्येकाचे कर्तव्य ठरते. ही भूमिक असल्याने सरकारने ऐकले नाही तर वेळप्रसंगी रस्त्यावर उतरू आणि आर. आर. पाटील यांचे विचार जिवंत ठेवण्यासाठी कार्यरत राहू असे स्मिता पाटील म्हणाल्या. न्यायालयीन लढय़ाची माहिती देत सर्वोच्च न्यायालयात आर. आर. फाऊंडेशनच्या वतीने बाजू मांडली जात आहे, असे त्या म्हणाल्या. यावेळी आर. आर. पाटील फाऊंडेशनचे विनोद पाटील, भाऊसाहेब पाटील चिकटगावकर व आमदार सुभाष झांबड यांची भाषणे झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा