छत्रपती संभाजीनगर : बीडमधील नारायण गडाच्या ७२ व्या नारळी अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त सिरसमार्ग गावात आयोजित कार्यक्रमाप्रसंगी महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे व मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील रविवारी एकाच मंचावर आले. दोघांनीही एकमेकांशी हितगुज केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

 पंकजा मुंडे यांनी मनोज जरांगे यांच्याशी झालेल्या संवादात प्रकृतीची विचारपूस केल्याची माहिती मिळाली. आठवडाभरापूर्वीच मनोज जरांगे पाटील व पंकजा मुंडे यांचा आरक्षणावरून कलगीतुरा रंगला होता.

मनोज जरांगे यांच्यासोबतचे आणि पंकजा मुंडेंबरोबर आलेल्या कार्यकर्त्यांची नारळी सप्ताहाच्या मंचावर एकच गर्दी झाली. अखेर पंकजा मुंडे यांना ध्वनिक्षेपकाचा ताबा घेऊन उपस्थित कार्यकर्त्यांना बाजूला होण्याचे आवाहन करावे लागले.  पंकजा मुंडे येण्यापूर्वी काही मिनिटेच आधी मनोज जरांगे पाटीलही तेथे पोहोचले होते.

हेही वाचा >>>“हा ओबीसींची मतं मिळवण्यासाठी केलेला…”, प्रकाश शेंडगेंना मिळालेल्या धमकीप्रकरणी मनोज जरांगे पाटलांची प्रतिक्रिया

 संस्थानच्या वतीने सत्कार स्वीकारून पंकजा मुंडे यांनी आपल्याला गडाचे महंत शिवाजी महाराज यांचे आशीर्वाद घ्यायचे असल्याचे सांगितले. त्यानंतर मात्र, पंकजा मुंडे या निघून गेल्या. 

विधानसभा लढवण्याचे संकेत

मराठा आरक्षणाशी संबंधित विधान मनोज जरांगे यांनी पुन्हा केले. सगेसोयऱ्यांच्या अटीनुसार मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही तर येत्या काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुका लढवण्याचे संकेत मनोज जरांगे पाटील यांनी नारायण गडावरून उपस्थितांसमोर बोलताना दिले.

(श्री क्षेत्र नारायणगड नारळी सप्ताह, सिरसमार्ग या ठिकाणी पंकजा मुंडे यांनी भेट देऊन आदरणीय महंत ह.भ.प शिवाजी महाराज यांचे आशीर्वाद घेतले व  भाविकांशी संवाद साधला. याप्रसंगी मनोज जरांगे पाटील यांची आणि पंकजा मुंडे यांची भेट झाली.)

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pankaja munde jarange patil on a platform in beed amy