छत्रपती संभाजीनगर : कळपातील सहकाऱ्यांसोबत हुंदडत-चरत असताना काळवीट प्रजातीतील हरिणीला अचानक पक्षाघाताचा झटका आला आणि ती शेतशिवारातच पडून राहिली. ग्रामस्थ आणि वनविभागाने उपचारासाठी बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात असलेल्या सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्रामध्ये दाखल केले. तेथे घायाळ हरिणीला पक्षाघात आल्याचे आणि पोटुशी असल्याचे निदान झाले. शनिवारी दुपारी त्या हरिणीने एका गोंडस पाडसाला जन्म दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

बाळंतपण सर्पराज्ञीत झालेले असून पाडसाची तब्येत ठणठणीत आहे, मात्र त्याची आईची म्हणजे मादी काळवीट गंभीर असल्याची माहिती सर्पराज्ञीच्या संचालिका सृष्टी सोनवणे यांनी दिली. तर सिध्दार्थ सोनवणे यांनी सांगितले की, पक्षाघात झालेली ही काळवीटाची मादी कामखेडा (ता. बीड) येथील शेतकरी काळकुटे यांच्या शेतात घायाळ अवस्थेत चार दिवसापूर्वी आढळून आली होती.

हेही वाचा…छत्रपती संभाजीनगर: बाेगस कापूस बियाण्यांची विक्री; गंगापूरमध्ये गुन्हा

या घटनेची माहिती कामखेडा येथील युवक सचिन मस्के यांनी वन विभागाला दिली होती. त्यानंतर वन विभागाचे वनरक्षक पवारताई व राजेंद्र कोकणे यांनी घटनास्थळी जाऊन या काळविटाच्या मादीस ताब्यात घेतले होते. त्यानंतर पुढील उपचारासाठी विभागीय वन अधिकारी अमोल गर्कळ यांच्या मार्गदर्शनाखाली तागडगाव येथील सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्रात दाखल केले होते. हरणीवर योग्य ते उपचार सुरू करून शनिवारी बाळंतपणही सुखरूप पार पडले.