धाराशिव : मतदानाच्या दिवशी आचारसंहितेचा भंग होऊ नये म्हणून मतदान अधिकारी कर्मचारी आणि मतदारांना मतदान केंद्राच्या २०० मीटर पर्यंत चप्पल वापरण्यास बंदी करावी अशी अजब मागणी परंडा विधानसभा मतदारसंघातील एका उमेदवाराने केली आहे. परंडा विधासभा मतदारसंघातील एका उमेदवाराचे चिन्ह चप्पल आहे. त्यामुळे आचार संहितेचे पालन व्हावे म्हणून हे निवेदन दिले असल्याचे अपक्ष उमेदवार गुरूदास संभाजी कांबळे यांनी सांगितले आहे.

२४३ परंडा विधानसभा मतदारसंघात गुरूदास संभाजी कांबळे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढत आहेत. त्यांचा मतदान मशीनवरील मतानुक्रमांक १२ असून त्यांना निशाणी चप्पल मिळाले आहे. आदर्श आचारसंहिता नियमानुसार मतदान बूथ पासून २०० मीटरच्या आत कोणत्याही उमेदवाराचे चिन्ह प्रकाशित किंवा प्रदर्शीत करण्यास सक्त मनाई आहे. चप्पल घालून मतदान केंद्रात गेल्याने आदर्श आचारसंहितेचा भंग होऊ शकतो व आचार संहितेचा कोणत्याही प्रकारचा भंग होऊ नये म्हणून अपक्ष उमेदवार गुरुदास संभाजी कांबळे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी २४३ परंडा विधानसभा यांना माझी निशाणी चप्पल असून त्याचा प्रचार व प्रसार मतदान बूथ पासून २०० मीटरच्या आत आचार संहीता भंग होऊ नये याची मी स्वतः दखल घेत असून त्याकरिता दी.२०/११/२४ रोजी मतदानाच्या दिवशी मतदान बूथच्या २०० मीटर अंतरामध्ये कोणतेही कर्मचारी, पदाधिकारी, उमेदवार,व मतदार यांनी जर २०० मीटरच्या आत चप्पल घालून प्रवेश केल्यास त्यांच्यावर कडक कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

Fraud, cheap house, government quota,
सरकारी कोट्यातून स्वस्त दरात घरे देण्याच्या नावाखाली सुमारे २५ कोटींची फसवणूक, पुरुषोत्तम चव्हाणसह इतर आरोपीविरोधात गुन्हा
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Delhi Assembly Elections 2025 Seven AAP MLAs resign
‘आप’च्या सात आमदारांचे राजीनामे; पक्ष नेतृत्व विचारसरणीपासून दूर जात असल्याचा आरोप
Why were local elections delayed in the state
राज्यात स्थानिक निवडणुका लांबणीवर का पडल्या? तिसरी बाजी कोणाची? 
BJP vs Congress which political party has bigger bank balance
BJP vs Congress : भाजपा आणि काँग्रेस… दोन्ही पक्षांच्या बँक बॅलन्समध्ये नेमका फरक किती? निवडणूक आयोगाच्या डेटामधून समोर आली माहिती
Motor Accident Claims Tribunal , vacancies ,
मोटार अपघात दावा न्यायाधिकरणातील रिक्त पदे कधी भरणार ? उच्च न्यायालयाची राज्य सरकारला विचारणा
rahul gandhi mallikarjun kharge (1)
देणग्यांच्या बाबतीतही काँग्रेस पिछाडीवर; वर्षभरात जमा झाला १,१२९ कोटींचा निधी
BJP leader manoj tiwari interview
ते ‘रेवड्या’ वाटतात, आम्ही ‘मोफत’ देतो; भाजपा नेते मनोज तिवारींची ‘आप’वर टीका

हेही वाचा : आपल्या भविष्याचा विचार करणार्‍याच्या पाठीशी उभे रहा, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री गडकरी यांचे आवाहन

चप्पल ही माझी निशाणी असल्याने ती पायात घातल्याने माझा प्रचार व प्रसार लोकांनी चप्पल पायात घालून प्रवेश केल्याने होऊ शकतो. व आचार संहिता भंग होणार याच्यात शंका नाही. तरी मतदान बूथ पासून २०० मीटरच्या आत बुधवार दि. २०/११/२४ रोजी कोणत्याही व्यक्तीला चप्पल घालून प्रवेश न करु देणे हा आदर्श आचार संहितेचा भाग असून या नियमाचे पालन काटेकोरपणे करणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे असल्याचे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे

त्यामुळे २०० मीटरच्या आत चपला ठेवण्याची व्यवस्था करणे. व मतदारास २०० मीटर अंतरामध्ये पायाला कोणतीही दुखापत होऊ नये याबाबत सुव्यवस्था करावी. तसेच सदरील निशाणी ही चप्पला असून निशाणी म्हणून आपण कोणतीही एक डिझाईन देतो. परंतु चप्पला विविध डिझाईन मध्ये नागरिक घालतात आणी आपल्या निशाणीचा उल्लेख चप्पला असा आहे. त्यामुळे डिझाईनकडे लक्ष न देता उच्चराला महत्व द्यावे. व चप्पल घालून मतदान केंद्रापासून २०० मीटरच्या आत प्रवेश दिल्याने आदर्श आचारसंहितेचा भंग होऊ नये याची आपण सर्व विधानसभा क्षेत्रात दखल घ्यावी असे लेखी निवेदन निवडणूक निर्णय अधिकारी २४३ परंडा यांना दिले आहे.

हेही वाचा : ७० मतदारसंघांत सोयाबीन ‘रोष’

या अजब मागणीमुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यासह मतदान अधिकारी कर्मचारी नेत्यांची मोठी अडचण होणार असल्याने. यावर निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे. आता मतदान केंद्रात कर्मचारी, पदाधिकारी, मतदारांना चप्पला घालून प्रवेश मिळणार का ? का २०० मीटर वरून चप्पला काढून मतदान केंद्रात प्रवेश मिळणार हे पाहावे लागणार.

Story img Loader