Parli Assembly Constituency: परळी विधानसभा: लोकसभेनंतर धनंजय मुंडेंना पुन्हा धक्का? शरद पवारांची खेळी यशस्वी होणार?

Parli Assembly Constituency Maharashtra Assembly Election 2024: बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रातील सर्वात चर्चेत राहणाऱ्या मतदारसंघापैकी एक आहे. यंदा धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एकत्र असले तरी शरद पवार यांच्या डावपेचांचा सामना त्यांना करावा लागणार आहे.

dhananjay munde criticized sharad pawar
धनंजय मुंडे आणि शरद पवार ( फोटो – लोकसत्ता ग्राफीक्स टीम )

Parli Assembly Constituency Maharashtra Assembly Election 2024: भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे बीडमधील परळी विधानसभेची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला झाली. २००९ साली गोपीनाथ मुंडे लोकसभेवर गेल्यानंतर त्यांची लेक पकंजा मुंडे यांनी परळीचे नेतृत्व केले. दोन टर्म आमदार राहिल्यानंतर २०१९ साली धनंजय मुंडे यांनी या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून विजय मिळविला. आता धनंजय मुंडे हे अजित पवारांबरोबर आहेत. पकंजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील राजकीय वितुष्टही संपले आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यासमोर मुंडे घराण्याचा उमेदवार नसेल. पण धनंजय मुंडेंना शरद पवारांच्या डावपेचांचा मात्र सामना करावा लागणार आहे. शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीला धनंजय मुंडेंचेच एकेकाळचे सहकारी असलेले बजरंग सोनवणे यांना बाजूला काढून उमेदवारी दिली आणि त्यांना जिंकूनही आणले. आता विधानसभा निवडणुकीतही शरद पवार यांच्याकडून असाच एखादा उमेदवार देण्याची शक्यता आहे.

परळी विधानसभेचा इतिहास

परळी विधानसभा मतदारसंघाची रचना झाल्यापासून याठिकाणी कमळ चिन्हाचा उमेदवार निवडणूक लढवत आला होता. मात्र चाळीस वर्षांमध्ये प्रथमच परळीत कमळ चिन्हाचा उमेदवार नसेल. १९७८ मध्ये भाजपची स्थापना झाली तेव्हापासून म्हणजे १९८० पासून परळीमध्ये गोपीनाथ मुंडे यांच्या रुपाने कमळ चिन्ह रुजले. तत्पूर्वी हा मतदारसंघ रेणापूर विधानसभा मतदारसंघ म्हणून ओळखला जात होता. लातूर ग्रामीणचा काही भाग त्याला जोडलेला होता. या मतदारसंघातील रचनेमुळे गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख यांच्यातील मैत्र जुळलेले होते. १९८० मध्ये गोपीनाथ मुंडे यांनी कमळ चिन्हावर निवडणूक लढवली. ते एकदाच पराभूत झाले. १९८५ मध्ये पंडित अण्णा दौंड या काँग्रेसच्या उमेदवारांनी त्यांचा पराभव केला होता. या निवडणुकीनंतर १९९०, १९९५ , १९९९, २००४ पर्यत गोपीनाथ मुंडे विजयी होत राहिले. २००९ च्या निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली.

three member of chavan family name in bjp lottery draw
भोकरमध्ये चव्हाण कुटुंबातीलच तिघे
bigg boss 18 advocate Gunaratna sadavarte entry with pet donkey max in salman khan show watch promo
Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंची शोमध्ये एन्ट्री,…
Beed Assembly Constituency Sandip kshirsagar
Beed Assembly constituency: बीड विधानसभा मतदारसंघ: काका-पुतण्याच्या संघर्षानंतर आता भावा-भावात सामना होणार?
Jalgaon Rural Vidhan Sabha Constituency Assembly Election 2024
Jalgaon Rural Vidhan Sabha Constituency : गुलाबराव विरुद्ध गुलाबराव सामना पाहायला मिळणार? ‘या’ गोष्टी ठरू शकतात निर्णायक?
Dada Bhuse And Malegaon Politics
Malegaon Outer : मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघावर दादा भुसेंचं वर्चस्व नेमकं कसं आहे? जाणून घ्या
Pratap Sarnaik in Ovala Majiwada Vidhan Sabha Constituency Assembly Election 2024
Ovala Majiwada Sabha Constituency : उच्चभ्रू वस्तीच्या मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना सामना रंगणार?
akola district, Mahayuti, Balapur assembly Constituency
महायुतीमध्ये बाळापूर मतदारसंघ कळीचा मुद्दा
Karjat Jamkhed Assembly elections 2024
Karjat Jamkhed Assembly Constituency: कर्जत-जामखेड विधानसभा; काका-पुतण्याच्या संघर्षाचा नवा आखाडा! यंदा आमदार कोण, राम शिंदे की रोहित पवार?

हे वाचा >> Beed Assembly constituency: बीड विधानसभा मतदारसंघ: काका-पुतण्याच्या संघर्षानंतर आता भावा-भावात सामना होणार?

धनंजय मुंडे यांचा उदय

परळी विधानसभा पंकजा मुंडे यांना देण्यात आल्यानंतर धनंजय मुंडे विरोधात गेले आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची वाट धरली. पुढे २०१४ मध्ये पंकजा मुंडे मंत्री झाल्या. याच काळात धनंजय मुंडे यांनी परळीमध्ये नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या गटात चांगली बांधणी करुन घेतली होती. दरम्यानच्या काळात राष्ट्रवादीने धनंजय मुंडे यांना विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते पद दिले. या संधीचे सोने करून दाखवत धनंजय मुंडे यांनी आपले नेतृत्व प्रस्थापित केले.

बहिण – भावात दिलजमाई

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यातील राजकीय संघर्ष संपुष्टात आला. भाजपाने लोकसभा निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली. धनंजय मुंडे यांनी त्यांना परळी मतदारसंघातून त्यांना ७४ हजार ८३४ मताधिक्य दिले. मात्र तरीही लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. जातीय समीकरणे बदलल्यामुळे अवघ्या साडे सहा हजार मतांनी पंकजा मुंडे पराभूत झाल्या.

धनंजय मुंडे यांच्या विरोधात आघाडी

कृषी मंत्री असलेल्या धनंजय मुंडे यांच्या विरोधात शेतकरी संघटना आणि सर्वपक्षीय नेत्यांनी आघाडी केल्याचा वृत्तांत काही दिवसांपूर्वी लोकसत्ताचे प्रतिनिधी बिपीन देशपांडे यांनी सत्ताकारण या सदरात दिला होता. स्थानिक विरोधकांनी मोट बांधून सर्वपक्षीय ‘शेतकरी संघर्ष समिती’ हा एक मंच स्थापन केला आहे. या मंचाच्या माध्यमातून विविध प्रश्न उपस्थित करून मुंडे यांना घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे.

शरद पवार गटाचा उमेदवार कोण?

तसेच शरद पवार यांनीही या मतदारसंघात उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. सप्टेंबर महिन्यात राजाभाऊ (राजेश) फड यांना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात प्रवेश देण्यात आला आहे. राजेश फड हे परळी तालुक्यातील युवानेते असून पंकजा मुडे यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख होती. याबरोबरच सुदामती गुट्टे यांनीही शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला आहे. तसेच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख हेही पवळीसाठी प्रबळ उमेदवार असल्याची चर्चा आहे. पण ते काँग्रेसमध्ये असल्यामुळे त्यांच्या संभाव्य उमेदवारीबाबत संभ्रम आहे.

मनोज जरांगे फॅक्टरचा इफेक्ट होणार?

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सुरू केलेले आंदोलन मराठवाड्यात अधिक तीव्र आहे. लोकसभा निवडणुकीत त्याचा परिणाम जाणवला. बीड हा मनोज जरांगे पाटील यांना माननारा जिल्हा आहे. तसेच लोकसभेत पंकजा मुंडे यांच्याविरोधात बजरंग सोनवणे यांचा विजय करण्यात जरांगे फॅक्टर महत्त्वाचा ठरल्याचे बोलले जाते. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी गुप्तपणे जरांगे यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. पण यावर अधिकृतपणे दोघांनीही भाष्य केलेले नाही. जर विधानसभेलाही ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद झाला आणि वंजारी मतांमध्ये विरोधकांनी फूट पाडली तर धनंजय मुंडे यांच्यासमोर आव्हान निर्माण होऊ शकते.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीची आकडेवारी काय?

१. धनंजय मुंडे – १,२२,११४

२. पंकजा मुंडे – ९१,४१३

३. भीमराव सातपुते – ४७१३

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Parli assembly constituency election 2024 dhananjay munde result ncp ajit pawar sharad pawar group candidate kvg

First published on: 08-10-2024 at 20:51 IST

आजचा ई-पेपर : छत्रपती संभाजीनगर

वाचा
epaper image

संबंधित बातम्या