राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी दाखल करण्यात येणाऱ्या नामनिर्देशनपत्रासोबत करुणा मुंडे यांच्याबाबतची खरी माहिती दडवली, अशी ऑनलाईन तक्रार केली आहे. या प्रकरणी परळीच्या फौजदारी न्यायालयाने धनंजय मुंडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा आदेश दिला आहे.
या प्रकरणावर आता २४ फेब्रुवारी रोजी परळीच्या फौजदारी न्यायालयात सुनावणी होणार असल्याचे तक्रारदाराचे वकील चंद्रकांत ठोंबरे यांनी सांगितले. धनंजय मुंडे यांनी त्यांच्या शपथपत्रात पत्नी राजश्री मुंडे आणि ३ मुली तसेच करूणा मुंडे यांच्या २ मुलांचा उल्लेख केला होता. मात्र करूणा मुंडे यांच्या नावावरील मिळकतीबाबत कुठलीही माहिती नमूद केली नाही. या प्रकरणी ऑनलाइन तक्रार केल्यानंतर ५ फेब्रुवारी रोजी न्यायालयात मूळ कागदपत्रे दाखल केली. त्यावरून न्यायालयाने मुंडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असल्याचे ॲड. ठोंबरे यांनी सांगितले.