छत्रपती संभाजीनगर: देशभर गाजत असलेल्या वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षेतील गैरप्रकार, तब्बल ६८ पैकीच्या पैकी गुण मिळणे, नियोजित तारखेआधीच निकाल जाहीर करणे, आदी सर्व प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश द्यावेत व कॅप राऊंडला स्थगिती देऊन जेथे संशय निर्माण झाला तेथे पुन्हा परीक्षा घेण्याचे आदेश द्यावेत अशी विनंती करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : छत्रपती संभाजीनगरमध्ये नीटच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन

याप्रकरणी निकिता विजय फंदाडे व इतर तीन जणांनी ॲड. रामराव बिरादार यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे. खंडपीठाचे न्या. मंगेश पाटील व न्या. शैलेश ब्रह्मे यांच्यापुढे १८ जून रोजी सुनावणी होणार आहे.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Petition filed against neet exam in aurangabad bench of bombay high court hearing on june 18 css