परभणी जिल्ह्यातील मानवत येथे ३० जणांना जेवणातून विषबाधा झाली. यामध्ये २२ लहान मुले आणि मुलींचा समावेश आहे. सर्वांना उपचारासाठी परभणी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सर्वांची प्रकृती सुखरूप आहे.
मानवत तालुक्यातील राजुरा या गावात आज (रविवार) ही घटना घडली. राजुरा इथे हरिनाम सप्ताह सुरु आहे. या सप्ताहामध्ये जेवणानंतर काही मुलांना मळमळ आणि उलटीचा त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना तात्काळ मानवत ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर काहींना परभणी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. दोन्ही ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरु असून आता घाबरण्याचे काही कारण नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सर्वांची प्रकृती सुखरूप असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Apr 2017 रोजी प्रकाशित
परभणी: जेवणातून २२ मुलांसह ३० जणांना विषबाधा
राजुरा इथे हरिनाम सप्ताहामध्ये जेवणानंतर काहींना त्रास सुरू झाला.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 23-04-2017 at 16:24 IST
Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Poisoning in food in manwath parbhani 30 admitted