पोलिसउपायुक्तांपासून पोलिस उपनिरीक्षकापर्यंत बदलीपात्र अधिकार्‍यांची यादी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन पोलिसमहासंचालनालयाकडे १० फेब्रूवारी पूर्वी पाठवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत, अशी माहिती आस्थापना विभागाचे अप्पर महासंचालक कुलवंतकुमार सरंगल यांनी दिली.

२०१४साली झालेल्या निवडणूक काळात कर्तव्यात हजर असलेल्या सर्व अधिकार्‍यांना जिल्ह्याबाहेर पाठवणे.व आगामी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होई पर्यंत ३०नोव्हे.२०१९ पर्यंत त्यांची कोणत्याही कारणास्तव कुठेही बदली होणार नाही याची काळजी घेण्यात यावी.
जर बदली करण्यासंदर्भात काही अडचणी येत असतील तर पोलिस महासंचलनालयातील आस्थापना विभागाशी संपर्क साधावा.त्याच प्रमाणे ३१ मे २०१९ पर्यंत सेवानिवृत्त होणार्‍या अधिकार्‍यांची वेगळी यादी त्वरीत पोलिस महासंचालकांकडे पाठवावी.
पोलिसआयुक्तालयाकडून बदलीपात्र अधिकार्‍यांची यादी मिळाल्यावर राज्य निवडणूक आयोगाशी सल्लामसलत करुन अधिकार्‍यांच्या बदलीवर शिक्कामोर्तब केले जाईल. बदली झालेल्या अधिकार्‍यांची नियुक्ती सायबर सेल, विशेष शाखा, अशा अकार्यकारी शाखेत देण्यात येईल . असे सरंगल यांनी म्हटले आहे.

Story img Loader