तक्रारदाराच्या भाऊ-भावजयीला अटक करून पोलीस कोठडी न घेता न्यायालयातून जामीन मिळवून देतो, यासाठी १२ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या िहगोली ग्रामीण पोलीस ठाण्यातील हवालदार जीवन माधवराव गवारे याच्याविरुद्ध िहगोली शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली.
लोहगाव येथे गेल्या जानेवारीत लहान मुलांना पोलिओचा डोस देण्यावरून अंगणवाडी सेविका विरुद्ध तक्रारदाराचा भाऊ-भावजयी यांच्यात वाद झाला. शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याच्या कारणावरून खिल्लारे पती-पत्नीवर िहगोली ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल झाला. या प्रकरणी तक्रारदाराचा भाऊ-भावजयीला अटक करून न्यायालयात पोलीस कोठडी न मागता, त्यांना पोलीस कोठडीत न ठेवता न्यायालयात जामीन मिळवून देण्यासाठी मदतीच्या नावाखाली आरोपी जीवन गवारे याने तक्रारदाराकडे १५ हजारांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीत १२ हजारांची लाच देण्याचे ठरले. तक्रारदाराने लाचलुचपत विभागात तक्रार दिली. लाचलुचपतचे पोलीस उपअधीक्षक सुनील जैतापूरकर यांच्या पथकाने ३ फेब्रुवारीला दराडे हॉटेलजवळ सापळा रचला. तक्रारदार खिल्लारे यांना आरोपी गवारे याने पुन्हा लाचेची मागणी केली. लाचेची रक्कम घेण्याचा प्रयत्न करीत असताना आरोपीला तक्रारदाराचा संशय आल्याने त्याने लाचेची रक्कम घेतली नाही. सोमवारी मात्र तपासाअंती सोमवारी पोलीस हवालदार गवारेविरुद्ध िहगोली शहर पोलिसात गुन्हा दाखल करून गवारेला अटक करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा