औरंगाबाद – शहरातील मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात कार्यरत काँन्स्टेबलने मंगळवारी सायंकाळी पिसादेवी परिसरातील राहत्या घरात पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २६ एप्रिल रोजी सायंकाळी उघडकीस आली. समीर संभाजी सोनवणे (वय ३८, रा. पिसादेवी पार्क, रो हाऊस) असे त्या पोलिस काँन्स्टेबलचे नाव आहे.
चिकलठाणा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रोडगे यांनी समीर संभाजी सोनवणे असे मृत कॉन्स्टेबलचे नाव असल्याची माहिती दिली. ठाण्यातून मिळालेल्या माहितनुसार समीर यांची पत्नी २३ एप्रिल रोजी बहिणीच्या मुलीच्या लग्नासाठी गेलेल्या होत्या. समीर हे एकटेच घरी होते. दरम्यान पत्नीने समीर यांना फोनवर संपर्क करण्याचा प्रयत्नही केला, मात्र प्रतिसाद मिळाला नव्हता. तसेच पाण्याचे जार, इतर साहित्य घेऊन आलेल्यांनाही आतून प्रतिसाद मिळाला नव्हता. अखेर पत्नी २६ एप्रिल रोजी लग्नाहून परत आल्यानंतर घराचा दरवाजा ठोठाविला असता आतून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता, गळफास घेतल्याचे समोर आले. परंतू २५ एप्रिल रोजी समीर यांना नागरिकांना पाहिल्याचेही काहींनी सांगितले.
पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या
शहरातील मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात कार्यरत काँन्स्टेबलने मंगळवारी सायंकाळी पिसादेवी परिसरातील राहत्या घरात पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २६ एप्रिल रोजी सायंकाळी उघडकीस आली.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 26-04-2022 at 23:44 IST
Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police station constable mukundwadi police suicide police officer amy