छत्रपती संभाजीनगर : अहमदनगर येथे औरंगजेबाचे पोस्टर दाखविल्याने उडालेला गोंधळ, राज्यात या कारणामुळे होणाऱ्या दंगली या पार्श्वभूमीवर खुलताबाद येथील भारतीय पुरातत्त्व विभागाच्या ताब्यात असणाऱ्या औरंगजेबाच्या कबरीस वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी भेट दिली. या भेटीमुळे उद्धव ठाकरे यांची राजकीय कोंडी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

आतापर्यंत शिवसेनेकडून कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त झाली नाही, असे सांगून जे या भेटीमुळे माझ्यावर टीका करतील ते ‘जयचंद’च्या औलादी आहेत, असे समजा, अशा शब्दांत प्रकाश आंबेडकर यांनी या भेटीनंतर टीका केली. दरम्यान विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आता औरंगजेबाचे थडगे उकरून काढण्याची काही एक आवश्यकता नव्हती, अशी एक वाक्याची प्रतिक्रिया ‘ लोकसत्ता’ शी बोलताना व्यक्त केली.

National Green Tribunal
National Green Tribunal : ‘एनजीटी’च्या न्यायमूर्तींनी मुलाला ॲमिकस क्युरी म्हणून नियुक्त केल्याचा आरोप; याचिका दाखल, काय आहे प्रकरण?
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
cbi arrests rg kar ex principal and psi
कोलकाता बलात्कार प्रकरणी महाविद्यालयाच्या माजी प्राचार्यासह पोलीस निरीक्षकाला अटक; पुराव्याशी छेडछाड केल्याचा आरोप
Abhishek Ghosalkar murder case, CBI,
अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे, मुंबई पोलिसांच्या तपासातील त्रुटींवर उच्च न्यायालयाचे बोट
dr babasaheb ambedkar Photograph torn jitendra awad moved to high court
मुंबई : डॉ. आंबेडकर यांचे छायाचित्र फाडल्याचे प्रकरण, सगळे गुन्हे एकत्रित करण्याच्या मागणीसाठी आव्हाड उच्च न्यायालयात
prakash ambedkar reaction on devendra fadnavis
देवेंद्र फडणवीसांनी सुरत लुटीबाबत केलेल्या विधानावरून प्रकाश आंबडेकरांची टीका; म्हणाले, “भाजपा-आरएसएसला आजही…”
man attempt suicide by shooting himself due to a love affair
प्रेम प्रकरणातून डोक्यात गोळी झाडून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न – हडपसर भागातील घटना
Chandrapur, Wekoli, electronic weighing machine, fraud, crores of rupees loss, electronic chip, Ramnagar police, Faiz Traders, Vekoli employees,
चंद्रपूर : वजन काट्यात चीप लावून गैरप्रकार, वेकोलीच्या चार जणांविरूध्द गुन्हा

वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांचे शिबिर खुलताबाद येथे घेण्यात आले. या शिबिरानंतर जरजरी बक्षचा दर्गा आणि औरंगजेबाच्या कबरीच्या संरक्षित स्मारकास प्रकाश आंबेडकर यांनी भेट दिली. काही महिन्यांपूर्वी एमआयएमचे अकबरोद्दीन ओवेसी आणि खासदार इम्तियाज जलील यांनी भेट दिली होती. त्यानंतर ॲड्. प्रकाश आंबेडकर यांनीही भेट दिली.

इतिहास इतिहास असतो तो पुसता येत नाही’, असे मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केल्याचे वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी सांगितले. या भेटीनंतर प्रकाश आंबेडकर यांनी भद्रा मारुतीच्या मंदिरासही भेट दिली. अनेकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या स्थळांना भेटी दिल्या असून प्रत्येकाचा सन्मान राखला जावा, अशी भूमिका त्यांनी या भेटींनतर व्यक्त केली. या भेटीनंतर शिवसेना नेत्यांनी मात्र प्रतिक्रिया देण्याचे टाळले. ‘ शिवसेनेचे हिंदूत्व हे प्रबोधनकारांच्या विचाराचे आहे. बाबासाहेब आंबेडकर आणि प्रबोधनकार यांच्या लढय़ाचे स्वरूपही सारखे होते’ असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.