मुंबई : समाजकारणापर्यंत विविध विषय आणि घटनांवर तरुणाईला आपले विचार मांडण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळवून देणाऱ्या ‘लोकसत्ता’च्या ‘वक्ता दशसहस्रेषु’ स्पर्धेची प्राथमिक फेरी रंगात आली आहे. नाशिकमधून शुभारंभ केल्यानंतर शुक्रवारी औरंगाबाद विभागाची प्राथमिक फेरी होणार असून ७ मार्चपर्यंत आठही विभागातून स्पर्धेची प्राथमिक फेरी पार पडणार आहे.
महाराष्ट्राला लाभलेल्या तेजस्वी वक्त्यांच्या परंपरेचा वारसा पुढे नेण्याच्या हेतूने ‘लोकसत्ता’ने सुरू केलेल्या ‘लोकसत्ता वक्ता दशसहस्रेषु’ या स्पर्धेमुळे राज्यभरातील तरुण विचारवंतांसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. या व्यासपीठावरून अवतीभवती घडणाऱ्या अनेक घटनांवरचे तरुणाईचे विचार, प्रत्येक घटनेचा चांगल्या आणि वाईट दोन्ही बाजूंनी वेध घेत त्यातून काही वेगळाच, नवीन विचार मांडण्याची क्षमता या तरुण पिढीत आहे. त्यांच्या मनातील या विचारस्पंदनांना व्यक्त होण्यासाठी खुले अवकाश या स्पर्धेच्या माध्यमातून मिळाले आहे. स्पर्धेतील आठही विभागांच्या प्राथमिक फेरीतून निवडलेले वक्ते हे विभागीय अंतिम फेरीत दाखल होतील. त्यानंतर आठही विभागांतून सर्वोत्तम ठरणाऱ्या वक्त्यांची महाअंतिम फेरी मुंबईत १७ मार्चला रंगणार आहे.
‘पितांबरी कंठवटी’ प्रस्तुत ‘लोकसत्ता वक्तृत्व स्पर्धे’चे असोसिएट पार्टनर श्री धुतपापेश्वर व पुनित बालन एंटरटेनमेंट प्रा. लिमिटेड आहेत. या स्पर्धेचे पावर्ड बाय पार्टनर वास्तू रविराज, आयटीएम ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ूशन्स, इंडियन आईल कॉर्पोरेशन लिमिटेड आणि जनसेवा सहकारी बँक आहेत. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक विषयांवर आपले विचार मांडण्यासाठी उत्सुक असलेल्या कोणत्याही मान्यताप्राप्त महाविद्यालयातील आणि १६ ते २४ या वयोगटातील विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होऊ शक तील. ही स्पर्धा एकूण आठ केंद्रावर तीन टप्प्यांत घेण्यात येणार आहे.
ंवेळापत्रक पुढीलप्रमाणे
विभाग तारीख स्थळ वेळ
औरंगाबाद १ मार्च देवगिरी इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनीअरिंग अॅण्ड मॅनेजमेन्ट, औरंगाबाद स. १० वा.
मुंबई २ व ३ मार्च मफतलाल सेंटर, नरिमन पॉइंट स. १० वा.
ठाणे २ व ३ मार्च ज्ञानसाधना शाळा, मनोरुग्णालयाजवळ (ठाणे प.) स. १० वा.
कोल्हापूर ५ मार्च शाहू स्मारक दसरा चौक, कोल्हापूर स. ११ वा.
नागपूर ५ व ६ मार्च सवरेदय आश्रम स. १० वा.
रत्नागिरी ५ मार्च डॉ.जे.एस.केळकर सभागृह (सेमिनार हॉल), गोगटे जोगळेकर महाविद्यालय स. १० वा.
पुणे ७ मार्च गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स (न्यू बिल्डिंग), कर्वे रोड, पुणे स. ९.३० वा.
विषय कोणते?
‘मी-टू’ पणाची बोळवण, ‘क्लोनिंग: माकडानंतर माणूस’, ‘चरित्रपटांचे चारित्र्य’, ‘खेळ की नायक’ हे या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे चार विषय आहेत. विषयांचा अभ्यास करण्यासाठी गुगल किंवा इंटरनेटच्या माहिती जालाचा वापर विद्यार्थ्यांनी करण्यास हरकत नाही. परंतु विषयांची मांडणी करताना केवळ ही माहिती देऊ नये. विषयांचा चौकस, र्सवकष विचार करणे अपेक्षित आहे. सामाजिक जाणिवा जागृत होतील अशा वैविध्यपूर्ण आणि अभ्यासात्मक दृष्टिकोनातून विषयाचे सादरणीकरण तरुण विचारवंतांनी करावे, जेणेकरून यातून विषयाचा सखोलपणा कळेल. स्पर्धेच्या नियम, अटी व प्रवेश अर्जासाठी लॉग ऑन करा – http://loksatta.com/vaktrutva-spardha-2019
नाशिकमध्ये आज विभागीय अंतिम फेरी
‘लोकसत्ता वक्ता दशसहस्त्रेषु’ या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी असलेल्या वक्तृत्व स्पर्धेची विभागीय अंतिम फेरी शुक्रवारी गंगापूर रस्त्याजवळील प्रसाद मंगल कार्यालयात सायंकाळी साडेपाच वाजता रंगणार आहे. महाअंतिम फेरीत पोहचलेल्या नऊ स्पर्धकांच्या वक्तृत्व कलेचा कस लागणार आहे. कुसुमाग्रज स्मारक येथे झालेल्या प्राथमिक फेरीत नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध ठिकाणांहून आलेल्या स्पर्धकांनी आपल्यातील वक्तृत्वविषयक गुणवत्तेचे दर्शन घडवल्यानंतर वैशिष्ठय़पूर्ण पध्दतीने विषयांची मांडणी करणारे नऊ स्पर्धक अंतिम फेरीत धडकले आहेत.
अधिक माहितीसाठी संपर्क- मुंबई- युसुफ कोलंबोवाला – ९९२०७९३३५५, अमित जाधव-७९७७२४२४८५, प्रदीप पांडे- ९८९२६८७०१०, सुभाष कदम -९७६९३६८१११. नवी मुंबई- समीर म्हात्रे- ९०२१७८३४०८. ठाण – कमलेश पाटकर – ९८२०६६४६७९, मिलिंद दाभोळकर- ९१६७२२१२४६, सुधीर दळवी- ७७९८६००३४८. पुणे- अमोल गाडगीळ – ९८८१२५६०८२. नाशिक- वंदन चंद्रात्रे- ९४२२२४५०६५, ९२२५११३९८३. नागपूर (शहर) – गजानन बोबडे- ९८२२७२८६०३. रत्नागिरी – हेमंत चोप्रा- ९४२२०५२४७६, ९४२००९५१०४. विदर्भ- शरद भुते – ९०९६०५०७४०. औरंगाबाद- सदाशिव देशपांडे – ९९२२४००९७६.