शारीरिक संबंधाची अश्लील चित्रफीत काढून कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्यास ५० लाख रुपयांची मागणी करून ब्लॅकमेल करणाऱ्या २२ वर्षीय तरुणीला पोलिसांनी बसस्थानकातच एक लाख रुपये घेताना रंगेहाथ पकडले. तरुणीचा साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. तरुणीला न्यायालयाने सोमवापर्यंत पोलीस कोठडी दिली. शहरात वर्षभरातच अश्लील चित्रफीत करून पुरुषांना ब्लॅकमेल करणाऱ्या दोन तरुणी पोलिसांच्या जाळ्यात अडकल्या.
जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्याची या तरुणीने काही दिवसांपूर्वी दुसऱ्या मुलीची प्राचार्याशी ओळख करून दिली. दोघीही औरंगाबाद येथे शिक्षणासाठी खोली घेऊन राहत असत. संबंधित तरुणीने प्राचार्याला औरंगाबादला बोलावून त्याच्याशी शरीरसंबंध ठेवले. दरम्यान, काही दिवसांपूर्वी या तरुणीने शरीरसंबंधाची काढलेली चित्रफीत प्राचार्याच्या मोबाइलवर पाठवून ५० लाख रुपये द्या, अन्यथा ही चित्रफीत घरच्यांना दाखवू, सोशल मीडियावर व्हायरल करू अशी धमकी दिली. या प्रकाराने आपण पुरते फसले गेल्याची जाणीव झाल्यानंतर प्राचार्याने पोलीस उपअधीक्षक गणेश गावडे यांच्याशी संपर्क केला.
यापूर्वीही अशाच पद्धतीने महिलेने तरुणाला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार गावडे यांनी उघडकीस आणला होता. त्यामुळे संबंधित प्राचार्याने गावडे यांना सर्व हकिकत सांगितल्यानंतर पोलिसांनी सापळा लावला. तरुणीशी बोलून दहा लाख रुपयांत तडजोड करण्यात आली आणि तिला पशासाठी बीडला बोलावले. पसे मिळणार असल्याने तरुणी व तिचा साथीदार बुधवारी सायंकाळी बसस्थानकात आला. नंतर प्राचार्यही तेथे गेले. पाकिटातील एक लाख रुपये तरुणीने स्वीकारले. याचे सर्व गुप्त चित्रीकरण पोलिसांनी केले. तरुणीने पसे घेताच पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. मात्र, काही अंतरावर असलेला तिचा साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाला. तरुणीला पोलिसांनी गुरुवारी न्यायालयासमोर उभे केले असता १४ डिसेंबपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. तरुणीच्या फरारी साथीदाराचा पोलीस शोध घेत आहेत.
शहरात काही महिन्यांपूर्वीच एका महिलेने तरुणाबरोबरची अश्लील चित्रफीत तयार करून ब्लॅकमेल करणे सुरू केले होते. मात्र, महिला ब्लॅकमेल करीत असल्याने तरुणाच्या मनात आत्महत्येचा विचार घोळत असतानाच त्याने उपअधीक्षक गणेश गावडे यांची भेट घेऊन हकिकत सांगितल्यानंतर गावडे यांनी या महिलेला सापळा रचून पकडले. त्यामुळे पोलिसांबद्दलचा विश्वास दृढ झाल्याने प्राचार्यानेही पोलिसांची मदत घेऊन ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणीला धडा शिकवला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा