छत्रपती संभाजीनगर  –  वाळूजनजीकच्या बकवालनगरात चालवण्यात येणाऱ्या अवैध गर्भपात केंद्रावर वैद्यकीय अधिकारी व पोलिसांच्या पथकाने बुधवारी सायंकाळी मारला. विशेष म्हणजे यामध्ये केंद्रचालवणारी आशा कार्यकर्तीच असून तिच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याविषयी वाळूज पोलिसांनी सांगितले की, दक्ष नागरिकांनी याविषयीची एक तक्रार हेल्पलाईनव्दारे थेट पुणे येथे केली होती. त्याचा अहवाल छञपती संभाजीनगरच्या जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात प्राप्त झाला होता. त्यानुसार जिल्हा चिकित्सकांच्या गुप्त आदेशान्वये गंगापूरचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. रमेश पवार यांनी यासाठी रूग्णालयाचे एक पथक नियुक्त केले. त्यांनी सोबत वैद्यकिय अधिकारी डाॅ. सुदाम लगास आणि काही पंच घेऊन वाळूज पोलिसांच्या मदतीने बकवालनगरात बुधवारी सापळा लावून संबंधित केंद्रावर छापा टाकला. त्या ठिकाणी चक्क एक आशा कार्यकर्ती आशा जाधव ही  स्वतःच्या घरावर सुरभी मदर केअर सेंटर या नावाने फलक लावून गर्भपात केंद्र चालवत असल्याचे समोर आले.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raid illegal abortion centers in chhatrapati sambhajinagar amy